शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मुजोर वाहन चालक पोलिसांच्या रडारवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 18:23 IST

मागच्या वर्षी मडगाव वाहतूक पोलिसांकडून ६५ हजार ८९५ प्रकरणांची नोंद, ८३ लाख ८९ हजार दंड वसूल

ठळक मुद्दे २0१८ साली मडगाव वाहतूक विभाग अख्यत्यारीत ४६ जणांना अपघाती मृत्यू आला.२०१७ साली हा आकडा ५९ इतका होता. दंड २ लाख ३३ हजार रुपये वसूल करण्यात आला आहे. काळया कांचाच्या एकूण २३४४ प्रकरणे घडली असून दंडापायी २ लाख ३५ हजार रुपये पोलिसांनी सरकारी तिजोरीत जमा केले आहे.

मडगाव - वाहतूकीचे नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर मडगाव वाहतूक पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. मागच्या वर्षी २0१८ साली वाहतूक नियम भंगाची एकूण ६५ हजार ८९५ प्रकरणे नोंदविण्यात आली असून एकूण ८३ लाख ८९ हजार ९00 रुपये दंड वसूल करण्यात आला. वाहतूक  पोलिसांनी वाहनचालकंवर कडक वॉच ठेवल्याने अपघाती मृत्यूच्या घटनेतही घट दिसून येत आहे. २0१८ साली मडगाव वाहतूक विभाग अख्यत्यारीत ४६ जणांना अपघाती मृत्यू आला.२०१७ साली हा आकडा ५९ इतका होता.

२०१७ साली मडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण २१ जणांना अपघाती मृत्यू आला होता. मागच्या वर्षी ही संख्या ३ इतकी होती. तर मायणा - कुडतरी पोलीस ठाण्यात २०१७ साली २३ जण मृत्यू पावले होते. २०१८ साली हाच आकडा २३ इतका होता तर कुंकळळी पोलीस ठाण्यात ही संख्या दोन वर्षापुर्वी १३ तर मागच्या वर्षी ७ असे होते. फातोडर्यात २०१७ साली दोघाजणांना अपघाती मृत्यू आला तर गेल्यावर्षी १३ जणांचा मृत्यू झाला.

विना हेल्मेट दुचाकी हाकण्याचे प्रमाण वाढत आहे. आता सेन्टीलन मोहिमेमुळे घरपोच तालांव हाती मिळत असल्याने वाहन चालकांत जागृती होउ लागली आहे. मागच्या वर्षी मडगाव वाहतूक पोलिसांनी विना हेल्मेटची एकूण २३ हजार ४८८ प्रकरणे नोंदवून घेताना २३ लाख ५० हजार १५० रुपये दंड वसूल केला. वाहने चालविताना मोबाईलचा वापरही मोठया प्रमाणात होत आहे. गेल्या वर्षी पोलिसांनी अशा प्रकाराची एकूण ५३६ प्रकरणे नोंद करुन घेताना २ लाख ७३ हजार ३00 रुपये दंड वसूल केला. धोकादायक पार्किंगच्या एकूण ७८४४ प्रकरणे मागच्या वर्षी नोंद झालीत तर एकूण ७ लाख ८९ हजार ७00 रुपये दंड पोलिसांनी सरकार दरबारी जमा केला. वेगाचे उल्लंघन करणाऱ्या १६४३ वाहन चालकांना पोलिसांनी तालांव दिला व ५ लाख ४९ हजार ७00 रुपये दंड वसूल केला.

दारु पिउन वाहने चालविणाऱ्या एकूण ७६९ प्रकरणे मागच्या वर्षी नोंद झालेल्या आहेत. क्षमतेपेक्षा जास्ती प्रवासी घेणारी एकूण १३५८ प्रकरणे नोंद असून, १ लाख ३८ हजार दंड पोलिसांनी वसूल केला आहे.  वाहतूक सिग्नल नियम मोडण्याच्या एकूण १९0८ प्रकरणे घडली असून १ लाख ९१ हजार ६00 रुपये दंड  वाहतूक  पोलिसांनी वसूल केला आहे. सिल्ट बेल्टविना चार चाकी वाहने हाकण्याच्या एकूण २३२४ प्रकरणी पोलीस दफ्तरी नोंद आहेत. दंड २ लाख ३३ हजार रुपये वसूल करण्यात आला आहे. काळया कांचाच्या एकूण २३४४ प्रकरणे घडली असून दंडापायी २ लाख ३५ हजार रुपये पोलिसांनी सरकारी तिजोरीत जमा केले आहे.

सदोष वाहन नोंदणी क्रमांक पटटीची एकूण २१०५ प्रकरणे नोंद असून, २ लाख ३१ हजार ८०० रुपये पोलिसांनी दंड वसूल केला आहे. आरशाविना वाहने चालविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. ११५२ जणांना तालांव देउन १ लाख १७ हजार ७00 रुपये दंड पोलिसांनी वसूल केला आहे. बेकायदेशीर पार्किगच्या एकूण ३५७७ प्रकरणे घडली असून,३ लाख ५८ हजार ५00 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहतुक नियम भंग करणाऱ्या चालकांचा वाहतूक परवाना रदद करण्याची शिफारसही वाहतूक पोलिसांकडून केली जात आहे. वेगमर्यादा ओलांडणाऱ्या एकूण १६४३ तर गुडस वाहनांमध्ये प्रवाशी घेणाऱ्या एकूण १५६ जणांची परवाना रद्द करण्याची शिफारस वाहतूक पोलिसांनी केली आहे. वाहने चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या ५३६ तर दारु पिऊन वाहने चालविणाऱ्या एकूण ७६९ जणांचा परवाना रद्द करण्याचीही शिफारस वाहतूक पोलिसांनी केली आहे. वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून वाहन नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती मडगाव वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांनी दिली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हPoliceपोलिस