शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पळवून नेलेल्या तरुणीची 3 दिवसात सुटका करणाऱ्या अप्पर पोलिस आयुक्तांचा खासदारांनी केला गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 16:49 IST

Kidnapping case : प्रविण पडवळ यांनी दाखवलेल्या चातुर्याबद्दल नुकताच उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार केला.

ठळक मुद्दे चांगल्या कामांसाठी पोलिस व जनप्रतिनिधींनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तरुण युवतींची फसवणूक टाळण्यासाठी सर्वच पालकांनी दक्षता घ्यावी असेही आवाहन खासदार शेट्टी यांनी केले.

मुंबई- मालाड पश्चिम मालवणी परिसरात रहाणा-या एका युवतीला तीन दिवसांपूर्वी फसवून एका युवकाने  पळवून नेण्याचा प्रकार घडला होता. उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त  प्रविणकुमार पडवळ यांच्या भाजपाचे वरिष्ठ नेते आर.यू.सिंह यांनी निदर्शनास आणून देताच या कार्यक्षम पोलिस आधिका-याने आपली सर्व शक्ती - युक्ती कामाला लावत तीन दिवसात या पळवून नेलेल्या युवतीला हैद्राबाद येथून सहीसलामत सोडवून तिच्या आई-वडिलांच्या सूपूर्द केले. 

प्रविण पडवळ यांनी दाखवलेल्या चातुर्याबद्दल नुकताच उत्तर मुंबईचे खासदारगोपाळ शेट्टी यांनी त्यांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार केला. राजकीय जिवनात काम करत असताना पोलिसांबरोबर अनेक वादाचे प्रसंग येतात, परंतू चांगले कामे करणाऱ्या पोलिस आधिका-यांचे कार्य समाजापुढे येणेही तितकेच गरजेचे आहे. मुंबईच्या बिघडलेल्या  कायदा व सुरक्षेबद्दल चिंता व नाराजी व्यक्त करुन मुंबईतल्या कायदा व सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी प्रविण पडवळ यांच्या सारख्या कार्यक्षम पोलिस अधिकाऱ्यांची मुंबईला गरज असल्याचे प्रतिपादन खासदार गोपाळ  शेट्टी यांनी या सत्कार प्रसंगी केले. चांगल्या कामांसाठी पोलिस व जनप्रतिनिधींनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.  तरुण युवतींची फसवणूक टाळण्यासाठी सर्वच पालकांनी दक्षता घ्यावी असेही आवाहन खासदार शेट्टी यांनी केले.

टॅग्स :PoliceपोलिसKidnappingअपहरणGopal Shettyगोपाळ शेट्टीBJPभाजपाMember of parliamentखासदार