प्रेयसीने त्याला फोन करून घरी बोलवलं, त्यानंतर जे घडलं ते वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 01:13 PM2021-09-18T13:13:41+5:302021-09-18T13:15:19+5:30

मरणासन्न स्थितीत पोलिसांनी तरूणाचा जबाब नोंदवला. तरूण राहुल यादवने सांगितलं की, तरूणीने फोन करून त्याला रात्री भेटण्यास बोलवलं होतं.

MP : Sagar couple burnt alive boy dead girl critical love affaire | प्रेयसीने त्याला फोन करून घरी बोलवलं, त्यानंतर जे घडलं ते वाचून चक्रावून जाल

प्रेयसीने त्याला फोन करून घरी बोलवलं, त्यानंतर जे घडलं ते वाचून चक्रावून जाल

googlenewsNext

मध्य प्रदेशच्या सागरमध्ये दोन वेगवेगळ्या जातीच्या तरूण-तरूणीत सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाचा दु:खद शेवट झाला. आरोप आहे की, सागर जिल्ह्यातील नरयावली पोलीस स्टेशन क्षेत्रात तरूणीला भेटण्यासाठी आलेल्या तरूणाला तरूणीच्या कुटुंबियांनी जिवंत जाळलं. या घटनेत तरूणीही भाजली आहे. तिच्यावर बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

सागरमधील लहरिया गावातून पोलिसांना फोनवर माहिती मिळाली होती की, एक तरूण आणि तरूणी यांना जाळलं आहे. त्यांना त्याच स्थितीत पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मरणासन्न स्थितीत पोलिसांनी तरूणाचा जबाब नोंदवला. तरूण राहुल यादवने सांगितलं की, तरूणीने फोन करून त्याला रात्री भेटण्यास बोलवलं होतं. तो म्हणाला की, जेव्हा तो तिच्या घरी पोहोचला तेव्हा तरूणीच्या कुटुंबियांनी पेट्रोल टाकून त्याला जाळलं. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. (हे पण वाचा : प्रेयसीला खुश करण्यासाठी कारची चोरी, पण पहिल्याच राइडमध्ये...)

तरूणीचा जबाब वेगळा

तरूणीचा जबाब थोडा वेगळा आहे. पोलिसांनुसार, तरूणी चंचल चौबेने पोलिसांना सांगितलं की, मृत राहुलने तिच्यावर ऑइल टाकून तिला पेटवलं. हे बघून कुटुंबिया तिला वाचवण्यासाठी आले. आता पोलीस दोन्ही जबाबांचं परिक्षण करत आहेत. तरूणाच्या जबाबावरून पोलिसांनी विष्णु शर्मा, राघवेंद्र, दीपक आणि शुभम नावाच्या व्यक्तीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

२५ वर्षीय राहुल मंडीत एका दुकानावर काम करत होता. तर तरूणी चंचल चौबेचं तीन महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. ती रक्षाबंधनाला माहेरी आली होती. मृत राहुल यादवचा मृत्यूआधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तो त्याच्या कुटुंबियांसोबत बोलत आहे. यावेळी तो म्हणाला की, त्याला बांधून तिच्या परिवाराने मारलं आणि पेट्रोल टाकून जाळलं. यात तो म्हणत आहे की, चंचल जवळच उभी होती, त्यामुळे ती भाजली गेली आहे. तिने मला मारलं नाही.

दरम्यान तरूण राहुलचे काका उमाशंकर यादव यांनी सांगितलं की, राहुलने त्यांना सांगितलं होतं की, तरूणी तीन दिवसांपासून कॉल करून त्याला बोलवत होती. जेव्हा तो भेटायला गेला तेव्हा तिच्या परिवाराने त्याचे हायपाय बांधून त्याला मारलं आणि नंतर पेट्रोल टाकून आग लावली.
 

Web Title: MP : Sagar couple burnt alive boy dead girl critical love affaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.