शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! मुलीनेच केली मित्राच्या मदतीने वडिलांची हत्या, कारण वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 15:41 IST

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, '४-५ ऑगस्टच्या रात्री पोलिसांना सूचना मिळाली की, तृत्पी नगरमध्ये रविदत्त दुबे नावाच्या व्यक्तीवर घरात घुसून कुणीतरी गोळी झाडली.

मध्य प्रदेशच्या ग्लाव्हेरमधून ५८ वर्षीय एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी त्याच्या मुलीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनुसार, तरूणीच्या वडिलाचा तिच्या अफेअरला विरोध होता आणि त्यामुळे आपल्या प्रेमाच्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी मुलीनेच वडिलाची हत्या केली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, '४-५ ऑगस्टच्या रात्री पोलिसांना सूचना मिळाली की, तृत्पी नगरमध्ये रविदत्त दुबे नावाच्या व्यक्तीवर घरात घुसून कुणीतरी गोळी झाडली. घटनेवेळी घरात रविदत्त, त्यांची पत्नी, दोन मुली आणि मुलगा झोपलेले होते. फायरिंगच्या आवाजाने ते उठले. तेव्हा त्यांना दिसलं की, रविदत्त रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले आहेत.  त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. (हे पण वाचा : Shocking! वडिलांनीच केली दोन बाळांची हत्या, लग्नाचं आमिष दाखवत दोन तरूणींशी ठेवले संबंध)

यावर पोलिसांनी तपास सुरू केला आणि हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केली. तपासाच्या सुरूवातीलाच पोलिसांना सर्वात संशयास्पद ही बाब वाटत होती की, कुणी घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊन हत्या कशी करू शकतो?

तपासादरम्यान पोलिसांनी परिवारातील लोकांचे कॉल डिटेल्स काढले. तेव्हा संशयाची सुई मृतकाच्या लहान मुलीवर गेली. कारण तिच्या मोबाइलवरून गेल्या २ आठवड्यात सर्वात जास्त कॉल्स पुष्पेंद्र नावाच्या तरूणाला लावले गेले होते.

तपासातून समोर आलं की, मृतकाच्या लहान मुलीचं ज्या तरूणासोबत अफेअर सुरू होतं. त्याला रविदत्तने मारहाण केली होती. ज्या तरूणासोबत मुलगी सतत बोलत होती तो तिच्या बॉयफ्रेन्डचा मित्र होता. जेव्हा पोलिसांनी तिची चौकशी केली तर ती फार काळ सत्य लपवून ठेवू शकली नाही. नंतर तिने सगळं सांगितलं.

पोलिसांना तिने चौकशी दरम्यान सांगितलं की, हत्येसाठी मृतकाच्या लहान मुलीने पुष्पेंद्रला तयार केलं होतं आणि यासाठी तिने त्याला पैसे देण्याबाबत आणि त्याच्यासोबत अफेअर करण्याबाबत आमिष दिलं होतं. हत्येच्या रात्री मृतकाच्या मुलीने आरोपी तरूणाला आधीच घरात लपवलं होतं. आणि जेव्हा सगळे झोपले तेव्हा तो हत्या करून फरार झाला होता. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी