शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

माता बालसंगोपन केंद्रातील सुरक्षा रक्षकांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 19:56 IST

हॉस्पिटलमधील मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

ठळक मुद्दे या मारहाणीची घटना तिसऱ्या डोळ्यात म्हणजे सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.22 मे (बुधवार) ला रात्री नालासोपारा पूर्वेकडील पाचअंबा मध्ये राहणारी 33 वर्षीय महिलेचा बाळंतपण सुरू होते.

नालासोपारा - वसई विरार महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. पण याच सुरक्षा रक्षकांना मारहाण झाल्याची गंभीर घटना बुधवारी रात्री घडली आहे. या मारहाणीची घटना तिसऱ्या डोळ्यात म्हणजे सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या संपुर्ण घटनेने महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना दोन दिवसांपूर्वी लेखी तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार महानगरपालिकेच्या "ब" प्रभाग समितीमधील नालासोपारा पूर्वेकडील सर्वोदय वसाहतीमध्ये माता बाल संगोपन केंद्र आहे. या हॉस्पिटलचा वैद्यकीय अधिकारी डॉ. गायत्री गोरख यांनी कार्यभार स्वीकारला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज चालते. 22 मे (बुधवार) ला रात्री नालासोपारा पूर्वेकडील पाचअंबा मध्ये राहणारी 33 वर्षीय महिलेचा बाळंतपण सुरू होते. त्यांना भेटण्यासाठी साडे दहाच्या सुमारास नातेवाईक भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. रात्रीची वेळ असल्याने सुरक्षा रक्षक जयप्रकाश मिश्रा आणि विनय दुबे या दोघांनी महिला वार्ड असल्याने पुरुष नातेवाईकांना बाहेर जाण्यासाठी सांगितले. पण त्यांनी बाहेर जाण्याऐवजी सुरक्षा रक्षकांसोबत हुज्जत घालण्याची सुरुवात केली व शेवटी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. नातेवाईकांनी ऑपरेशन कक्षामध्ये नेऊन जबर मारहाण केली होती. महिलेच्या नातेवाईकांनी केलेली मारहाणीची घटना हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही मध्ये चित्रण कैद झाले आहे. मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षकांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून मारहाणीची चौकशी करत आहे.  

मारहाणीच्या घटनेची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. ज्यांचा सुरक्षा रक्षकांचा ठेका आहे त्या कंत्राटदाराला सुद्धा माहिती दिलेली आहे. - डॉ. गायत्री गोरख (वैद्यकीय अधिकारी, वसई विरार महानगरपालिका हॉस्पिटल)

टॅग्स :hospitalहॉस्पिटलVasai Virarवसई विरारMuncipal Corporationनगर पालिकाPoliceपोलिस