शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

माता ना तु वैरिणी....आईनेच दोन मुलांना पाजले दुधातून कीटकनाशक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 22:21 IST

पतीबरोबर झालेल्या वादातून आईने आपल्या पाच व चार वर्षाच्या दोन मुलांना दुधातून किटकनाशक पाजून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला़...

ठळक मुद्देनऱ्हेतील घटना : आईचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पतीबरोबर झालेल्या वादातून आईने आपल्या पाच व चार वर्षाच्या दोन मुलांना दुधातून किटकनाशक पाजून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला़. त्यानंतर तेच दुध स्वत: पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला़ ही धक्कादायक घटना नऱ्हे येथे घडली़. आई आणि दोन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सिंहगड रोड पोलिसांनी दिली आहे़. कविता विश्वास गायकवाड (वय २७), त्यांची मुलगी प्रांजली (वय ५) आणि मुलगा आदित्य (वय ४) अशी त्यांची नावे आहेत़.  याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जीवन मोहिते यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सिंहगड रस्त्यालगत असलेल्या नऱ्हे भागात अनंत भुमकर यांच्या शेतात गायकवाड कुटुंबीय राहायला आहे. विश्वास गायकवाड आणि त्यांची पत्नी कविता मजूरी करतात. दोन दिवसांपूर्वी सकाळी स्वयंपाक लवकर केला नाही, या कारणावरुन विश्वास आणि कविता यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी विश्वास कामावर गेला. पतीबरोबर झालेल्या भांडणाचा राग कविताच्या मनात होता. त्यानंतर कविताने दुधात विषारी औषध मिसळून मुलगी प्रांजली आणि मुलगा आदित्य यांना दिले. कविता यांनी मुलांना दूध दिल्यानंतर स्वत: देखील दूध प्याले. दरम्यान, तिघांना उलट्या सुरु झाल्या. त्यावेळी शेतात असलेल्या रखवालदाराच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्याने तातडीने या घटनेची माहिती विश्वास यांना दिली. विश्वास घरी आला आणि तिघांना रुग्णालयात दाखल केले. कविता ही शुद्धीवर आल्यावर हा प्रकार उघडकीस आला़ तिघांवर उपचार सुरु असून मुलगा आदित्य याची प्रकृती चिंताजनक आहे. आदित्यला दुसºया एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. पाटील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखून