शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पैशांच्या वादातून जावयाने सासूवर झाडली गोळी, अटकेच्या भीतीने स्वतःवरही गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 07:59 IST

पैशांच्या वादातून तडीपार आरोपीने सासूवर गोळी झाडल्याचा प्रकार धारावीत समोर आला.

मुंबई : पैशांच्या वादातून तडीपार आरोपीने सासूवर गोळी झाडल्याचा प्रकार धारावीत समोर आला. तसेच, अटकेच्या भीतीने स्वतःवरही गोळी झाडून सायन रुग्णालयात दाखल करून घेतले आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी आरोपी कायामुद्दीन मोईनउद्दीन सय्यदविरोधात विरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. 

धारावी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद हा रेकॉर्डवरचा आरोपी असून त्याला तडीपार करण्यात आले. त्याची दोन लग्ने झाली असून  दुसरी पत्नी पीएमजीपी कॉलनी येथे राहते. त्याने पत्नीकडे ४० हजार ठेवण्यासाठी दिले, दोन दिवसाने ते पैसे घेण्यासाठी आला. 

मात्र, पत्नीने खर्च केल्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. याच, वादातून मंगळवारी सकाळी ७ वाजता त्याने पत्नीच्या घरी धाव घेतली. या वेळी तिचे दोन भाऊ आणि आई घरात होती. यादरम्यान कुटुंबीयांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. रागाने हा खाली आला. मात्र, चौथ्या मजल्यावरून सासूची बडबड सुरू होती. याच रागात जवळील पिस्तूलने त्याने सासूच्या दिशेने गोळी  झाड़ून पळ काढला. यामध्ये सासू थोडक्यात बचावली. घटनेची माहिती मिळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध सुरु केला. 

 

  • रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपीचे लोकेशन सायन रुग्णालय दाखवताच पोलिसांनी तेथे चौकशी केली. तेव्हा, आरोपी जखमी अवस्थेत दिसून आला. त्याच्या डाव्या हाताला गोळी लागल्याची माहिती मिळाली.
  • चौकशीत स्वतःच्या बचावासाठी त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवत त्याच्या कक्षात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी दिली.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईMONEYपैसा