शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

पाच मुलांची आई, पण सांभाळायला कुणी तयार नाही, तक्रार करताच तीन मुलगे अटकेत   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 16:07 IST

Crime News: पाच मुलगे असूनही एका वृद्ध आईवर दारोदारी भटकण्याची वेळ आली आहे. लहानाचे मोठे केलेल्या पाचही मुलांनी वृद्धापकाळात आधार देण्यास नकार दिल्याने अखेर या वृद्ध आईला अखेरीस पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली.

भोपाळ - मुले ही वृद्धापकाळातील आधार मानले जातात. मात्र आता बदलत्या काळाबरोबर वृद्ध आई-वडील हे मुलांना ओझे वाटू लागले आहेत. वृद्ध आई-वडलांचा सांभाळ करण्यास अनेक मुले तयार होत नाहीत. असाच एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशमध्ये समोर आला आहे. पाच मुलगे असूनही एका वृद्ध आईवर दारोदारी भटकण्याची वेळ आली आहे. लहानाचे मोठे केलेल्या पाचही मुलांनी वृद्धापकाळात आधार देण्यास नकार दिल्याने अखेर या वृद्ध आईला अखेरीस पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. (Mother of five children, but no one is ready to take care of her)

मध्य प्रदेशमधील राजागड येथील देवाखेडी गावातील रहिवासी असलेल्या रामकुंवर बाई ह्या पतीच्या निधनानंतर एकट्याच राहत आहेत. त्यांचे पाच मुलगे आहेत. मात्र त्यांचे विवाह झाल्यानंतर हे पाचही मुलगे त्यांच्या त्यांच्या पत्नींसह वेगळे राहू लागले. मात्र एकट्या राहिलेल्या वृद्ध आईचा सांभाळ करण्यासाठी कुणीही पुढे येईना.   अखेर मदतीसाठी लाचार झालेल्या या वृद्ध मातेने मदतीसाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर एसपी प्रदीप शर्मा यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिसांच्या माध्यमातून पाचही मुलांना समज दिली. मात्र तरीही वृद्ध आईला आधार देण्यास पाच मुलांमधील कुणीही तयार होईनात. अखेरीस पोलिसांनी पाचही मुलांविरोधात ज्येष्ठ नागरिक देखभाल अधिनियम २४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पाचपैकी राजेंद्र सिंह, हिंमत सिंह, आणि रमेश सिंह या तीन मुलांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. अन्य दोन मुलांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशFamilyपरिवार