शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हृदयद्रावक! पोलीस अधिकारी असलेल्या मुलाचा मृतदेह पाहून आईने सोडला प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 13:48 IST

Kishanganj Inspector Mob Lynching : मुलाच्या हत्येच्या धक्क्यात त्याच्या आईनेही देह सोडला. आपल्या मुलाच्या हत्येचे दुःख तिला सहन करता आले नसल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देया प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल सर्कल इन्स्पेक्टर मनीष कुमार यांच्यासह सात पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

किशनगंज: बिहारमधील किशनगंज टाऊनचे ठाणेदार अश्विनी कुमार यांच्या भीषण मॉब लिंचिंगनंतर पुन्हा त्यांच्या घरी शोककळा पसरली आहे. मुलाच्या हत्येच्या धक्क्यात त्याच्या आईनेही देह सोडला. आपल्या मुलाच्या हत्येचे दुःख तिला सहन करता आले नसल्याचे सांगितले जात आहे.शहीद पुत्राचा मृतदेह पाहून आईने आपला प्राण सोडला

पश्चिम बंगालमध्ये मॉब लिंचिंगने पीडित किशनगंज टाऊन पोलिस स्टेशनमधील अश्विनी कुमार याचा मृतदेह जेव्हा त्यांच्या घरी पोहोचला तेव्हा तिच्या आईला ते दृश्य पाहणं शक्य झाले नाही. मुलाचा मृतदेह पाहून आईनेही आपला प्राण सोडला. यानंतर संपूर्ण परिसराचे वातावरण अस्वस्थ झाले. त्याचबरोबर शहीद ठाणेदार अश्विनी कुमार यांच्या घरात दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.किशनगंज शहर स्टेशन प्रमुख अश्विनी कुमार यांच्या हत्येबाबत कुटूंबियात प्रचंड नाराजी आहे. कट रचल्यामुळे एसएचओची हत्या झाल्याचा आरोप परिवाराने केला आहे. ते म्हणतात की,पोलिस ठाण्यासमवेत गेलेले पोलिस अधिकारी आणि पोलिस दल तिथे उपस्थित असता आणि त्यांनी एक गोळी झाडली असती तर अश्विनीकुमार गर्दीच्या तावडीतून वाचले असते. 

 

ठाणेदार वगळता 7 पोलिसांना निलंबित केले 

या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल सर्कल इन्स्पेक्टर मनीष कुमार यांच्यासह सात पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. आयपीच्या सूचनेनुसार एसपीने कारवाई केली. पश्चिम बंगालच्या दिनाजपूर येथे जमावाने पोलीस अश्विनी कुमार यांना घेराव घातला असता हे पोलीस तेथून माघार घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.दारोगाच्या हत्येचा आरोपी असलेल्या आई-मुलाला अटक

शहीद ठाणेदार अश्वनी कुमार यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये फिरोज आलम, त्याचा भाऊ अबुजर आलम आणि त्याची आई सहयानूर खातून यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज हा घटनेतील मुख्य आरोपी आहे. किशनगंजला लागून असलेल्या पश्चिम बंगालच्या पंतपाडा येथे चौकशीसंदर्भात पोलीस दलासमवेत गेलेल्या इंस्पेक्टर अश्विनी कुमार यांच्यावर ग्रामस्थांनीहल्ला झाला. या वेळी मॉब लिंचिंगने त्याचा मृत्यू झाला.पोलिस मुख्यालयानुसार या प्रकरणातील आरोपींविरोधात एफआयआर नोंदविण्यात येत आहे. यात सहभागी असलेल्या तीन लोकांना अटक केली आहे. पूर्णियाचे आयजी आणि किशनगंजचे एसपी घटनास्थळावर तळ ठोकून आहेत. त्याच वेळी, डीजीपी एसके सिंघल यांनी या संदर्भात पश्चिम बंगालच्या डीजीपीशी संपर्क साधला आहे.  बंगालच्या डीजीपीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. पोलीस मुख्यालयानुसार शहीद निरीक्षक अश्विनी कुमार यांच्या कुटूंबावर अवलंबून असलेल्यांना अनुदान, सेवा लाभ आणि सरकारी नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी कारवाई केली जात आहे. शहीद इंस्पेक्टर अश्विनी कुमार यांना श्रद्धांजली वाहताना बिहार पोलिसांनी त्यांच्या कुटूंबियांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या.

टॅग्स :PoliceपोलिसLynchingलीचिंगwest bengalपश्चिम बंगालBiharबिहारArrestअटकsuspensionनिलंबनDeathमृत्यू