शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहाशेजारी मायलेकी 4 तास बसून होत्या, पोलीस हवालदाराची डोक्यात खलबत्ता घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 14:12 IST

Stabbing Case : पत्नी-मुलीकडून पोलीस हवालदाराची हत्या, मुलगी सासरी नांदत नसल्यावरून वाद

कल्याण:  मुलगी सासरी नांदत नाही या कारणावरून झालेल्या वादात मुलगी आणि पत्नीकडून पोलिस हवालदाराची डोक्यात खलबत्ता घालून हत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री ८ च्या सुमारास पुर्वेकडील नाना पावशे चौक भागात घडली. प्रकाश राजाराम बोरसे ( वय ५५) असे मृत पोलिस हवालदाराचे नाव असून ते मुंबईतील कुर्ला पोलिस ठाण्यात कार्यरत होते. हत्येप्रकरणी त्यांची पत्नी ज्योती ( वय ४५) आणि मुलगी भाग्यश्री या दोघींना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

बोरसे हे गुरूवारी कामावरून संध्याकाळी सात वाजता कोळसेवाडीतील नाना पावशे चौक परिसरातील रहात्या घरी आले.त्यांची मुलगी भाग्यश्री (वय २७) हिचे लग्न झाले असून तीचे सासरकडील आडनाव पवार असे आहे. परंतू तीचे नव-याबरोबर पटत नसल्याने ती आई वडीलांकडेच राहत होती. मुलगी सासरी नांदत नाही यावरून घरात रात्री आठच्या सुमारास भांडण झाले. या भांडणात पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री हिने घरातील खलबत्त्याने प्रकाश यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यात प्रकाश हे जागीच कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या हत्येची माहीती मिळताच वरीष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी घटनास्थळी पथक रवाना केले. दोघींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.मृतदेहाशेजारी चार तास बसून होत्याकोळसेवाडी पोलिसांना घटनेची माहीती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून ते घरात शिरले. घरात प्रकाश यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात पडला होता. तर मृतदेहाशेजारी माय-लेकी बसून होत्या. हत्या करून चार तास त्या मृतदेहाशेजारी बसून होत्या. घटना रात्री आठच्या सुमारास घडली परंतू ती चार तासांनी म्हणजे रात्री 12 वाजता उघडकीस आली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणPoliceपोलिसDeathमृत्यू