शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मन सुन्न करणारी घटना! १३ महिन्याच्या चिमुकल्याचा गळा चिरुन आईची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 18:12 IST

Murder And Suicide : उडदी येथील घटना : पुसद तालुक्यातील समाजमन झाले सुन्न

ठळक मुद्देस्वाती ज्ञानेश्वर लोहेकर (२२) असे मृत मातेचे तर वीर ज्ञानेश्वर लोहेकर (१३ महिने) असे मृत बालकाचे नाव आहे.

पुसद (यवतमाळ) : तालुक्यातील उडदी येथे खुद्द मातेनेच १३ महिन्याच्या चिमुकल्याचा गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर आईनेही गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री ७.२० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.स्वाती ज्ञानेश्वर लोहेकर (२२) असे मृत मातेचे तर वीर ज्ञानेश्वर लोहेकर (१३ महिने) असे मृत बालकाचे नाव आहे. पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उडदी येथे हृदयाला पाझर फोडणारी ही घटना घडली. स्वातीने प्रथम चिमुकल्या वीरचा धारदार शस्त्राने गळा चिरुन त्याला ठार केले. त्यानंतर तिने मुलाला पलंगावर ठेवून स्वत: घराच्या छताला नॉयलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडून होता.पोलीस पाटील मिलिंद मधुकर राठोड (३०) यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून मायलेकाचे मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. बीट जमादार प्रशांत भवरे यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. स्वातीने स्वत:च्या मुलाला ठार करून आत्महत्या का केली याचे गूढ अद्याप काय आहे. मात्र या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.गुढीपाडव्याच्या दिवशी घडले अघटितमराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने केली जाते. त्याच दिवशी उडदी येथे खुद्द मातेनेच मुलाची गळा चिरुन हत्या केली आणि आपलीही जीवनयात्रा संपविली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने समाजमन सुन्न झाले. हत्या आणि आत्महत्येमागील नेमके कारण शोधून काढण्याचे आव्हान पुसद ग्रामीण पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळDeathमृत्यूPoliceपोलिस