शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल दुचाकीचोराच्या बीड एलसीबीने आवळल्या मुसक्या; सात जिल्ह्यांत घातला होता धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 17:18 IST

गर्दी, कार्यक्रम, घरासमोर उभा केलेल्या दुचाकी चोरून परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या कालिदास लहुजी झिंजुर्डे या अट्टल चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज मुसक्या आवळल्या.

ठळक मुद्दे-२७ दुचाकी जप्त; टोळीतील साथिदारांचा शोध सुरू

बीड : गर्दी, कार्यक्रम, घरासमोर उभा केलेल्या दुचाकी चोरून परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या कालिदास लहुजी झिंजुर्डे (रा.नागडगाव ह.मु.गोविंदपुर ता.माजलगाव) या अट्टल चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून १४ लाख रूपये किंमतीच्या तब्बल २७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकीचोराने एक दोन नव्हे तर तब्बल सात जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. अखरे बीड पोलिसांनीच सापळा लावून त्याला बेड्या ठोकल्या.

कालिदास हा दुचाकी चोरण्यात पटाईत आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील बीडसह परभणी, उस्मानाबाद, जालना, लातूर, नांदेड, अहमदनगर अशा जिल्ह्यांमधून त्याने दुचाकी पळविलेल्या आहेत. दुचाकी चोरांची एक टोळी असून कालिदास हा त्याचा म्होरक्या आहे. दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढत गेल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. तर चोरट्यांचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. राज्यातील पोलीस कालिदासच्या मागावर होती. परंतु तो हाती लागत नव्हता.

आज तो माजलगावहून गोविंदपुरला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना मिळाली. त्यांनी सपोनि दिलीप तेजनकर व त्यांच्या टिमला सापळा लावण्यास सांगितले. दुचाकीवरून जात असतानाच त्याचा पाठलाग करून तेजनकर यांनी त्याला बेड्या ठोकल्या. चौकशीत पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने आपल्या गुन्ह्यांची कबूली दिली. त्याच्याकडून आतापर्यंत तब्बल २७ दुचाकी जप्त केल्या आहेत. त्याच्या इतर साथिदारांचाही शोध सुरू असल्याचे पोनि पाळवदे यांनी सांगितले. लवकरच टोळीचा पर्दाफाश केला जाईल, असेही ते म्हणाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, विकास वाघमारे, नसिर शेख, विष्णू चव्हाण, सतिष कातखडे, संतोष म्हेत्रे, गोविंद काळे, सुग्रिव रूपनर, भागवत बिक्कड आदींनी केली.

१० गुन्हे उघडगेवराई पोलीस ठाणे हद्दीत पाच, केज, धारूर, आष्टी, गोंदी व कळंब पोलीस ठाणे हद्दीतील तब्बल १० गुन्हे उघड झाले आहेत. 

इतर आरोपींचा शोध सुरू

एका दुचाकीचोराला अटक करून त्याच्याकडून २७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. त्याच्या इतर साथिदारांचा शोध सुरू आहे. तसेच त्याने चोरलेल्या दुचाकी कोणाला विक्री केल्या, याची माहिती घेणे सुरू आहे. लवकरच सर्व टोळी गजाआड करू. घनश्याम पाळवदे, पोनि, स्थानिक गुन्हे शाखा, बीड

टॅग्स :Beed policeबीड पोलीसtwo wheelerटू व्हीलरArrestअटकCrimeगुन्हा