शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

महिलांवरील अत्याचारांत दोषी ठरणारे राजस्थानात जास्त, राष्ट्रीय सरासरी २३ तर राज्यात तेच प्रमाण ४५ टक्के असल्याची पोलीस महासंचालकांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 06:09 IST

Crime News : देशात महिलांवरील अत्याचारांचे खटले ३४ टक्के प्रलंबित असून हेच प्रमाण राजस्थानात ९ टक्के आहे. महिलांविरुद्ध बनावट गुन्ह्यांचे प्रमाण वर्ष २०२० मध्ये राष्ट्रीय पातळीवर ३२४९७ होते.

- यशपाल गोयलजयपूर : राजस्थानात महिलांवरील अत्याचारांत आरोपी दोषी ठरण्याचे प्रमाण २०२० मध्ये ४५ टक्के होते तर राष्ट्रीय सरासरी २३ टक्के होती, असा दावा राज्याचे पोलीस महासंचालक एम. एल.लाथेर यांनी केला.   कोविड-१९ च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत स्थानिक न्यायालये नियमित भरू शकली नाहीत. खटल्यांची संख्या वाढली. परंतु, आता बलात्काराच्या १७ खटल्यांत न्यायालयांत आरोपी दोषी ठरले आहेत, असे ते म्हणाले. देशात महिलांवरील अत्याचारांचे खटले ३४ टक्के प्रलंबित असून हेच प्रमाण राजस्थानात ९ टक्के आहे. महिलांविरुद्ध बनावट गुन्ह्यांचे प्रमाण वर्ष २०२० मध्ये राष्ट्रीय पातळीवर ३२४९७ होते. यातील १२०८० बनावट खटले राजस्थानातील होते. राज्यात गुन्हेगारीचा आलेख १४ टक्क्यांनी वाढला आहे तो प्रत्येक तक्रार नोंदवून घेतली जात असल्यामुळे, असे सांगून लाथेर म्हणाले की, २०१९ मधील गुन्ह्यांच्या तुलनेत खूनाच्या घटनांत ३ टक्के, हत्येच्या प्रयत्नांत ९ टक्के आणि बलात्काराच्या घटनांत एक टक्का वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी बलात्कार झाल्याच्या दिलेल्या तक्रारींत १४ टक्के या बनावट निघाल्या, ती प्रकरणे मागे घेतली गेली, असे सांगून लाथेर म्हणाले, १७ टक्के पीडितांनी भारतीय दंड संहितेचे कलम १६४ अंतर्गत त्यांचे म्हणणे नोंदवताना ते बदलून टाकले.भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आधारे राजस्थानात गुन्ह्यांचा आलेख वाढला असल्याचा ठपका ठेवला होता.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी