शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

टोळक्याकडून १५ पेक्षा जास्त रिक्षा, मोटारसायकलची तोडफोड; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 19:25 IST

Crime News : याप्रकरणी उल्हासनगर व टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी देऊन दोघांना अटक केल्याची माहिती दिली. 

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील धोबीघाट व म्हारळ गावाच्या हद्दीत एका ८ ते ९ जणांच्या टोळक्याने रविवारी मध्यरात्री धुळघुस घालून १५ पेक्षा जास्त रिक्षा व मोटारसायकलची तोडफोड केली. तर म्हारळ गावातील काही जणांना मारहाण केल्याने, एक जण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी उल्हासनगर व टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी देऊन दोघांना अटक केल्याची माहिती दिली. 

उल्हासनगर धोबीघाट परिसर व खेमानी विभागात काही तरुण धुडघुस घालून नागरिकांना विना कारण मारहाण केल्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने, पोलिसही हैराण झाले. रविवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या दरम्यान शहराच्या हद्दीवरील म्हारळ गावात ८ ते ९ जणांच्या टोळक्याने धुडगूस घालून काही जणांना मारहाण करून मोटारसायकल व रिक्षांची तोडफोड केली. त्यानंतर टोळक्याने घोबीघाट परिसरात धुडगूस घालून रिक्षांची तोडफोड केली. याप्रकारने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून अश्या टोळक्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. म्हारळ गावात झालेल्या मारहाण व गाड्याच्या तोडफोड प्रकरणी टिटवाळा तर घोबीघाट परिसरात झालेल्या रिक्षाच्या तोडफोड प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते व पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दखल घेऊन चौकशी सुरू केली.

शहराच्या धोबीघाट व म्हारळ गाव हद्दीत धुळगूस व तोडफोड करणारे टोळके म्हारळ गाव व धोबीघाट परिसरातील राहणारे असून ८ ते ९ जनावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. याप्रकरणी संतोष ठाकूर व रवी चव्हाण या दोघांना उल्हासनगर पोलिसांनीअटक केली असून इतरांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली. अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसArrestअटक