लहान मुलांना बाहेर उभं ठेऊन आईनं कारमध्ये बॉयफ्रेंडसोबत ठेवले शरीर संबंध; अन् तितक्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 17:16 IST2021-12-21T16:27:41+5:302021-12-21T17:16:28+5:30
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; मुलांनी वारंवार आर्जवं करूनही महिलेचं दुर्लक्ष

लहान मुलांना बाहेर उभं ठेऊन आईनं कारमध्ये बॉयफ्रेंडसोबत ठेवले शरीर संबंध; अन् तितक्यात...
एका महिलेनं तिच्या दोन लहान मुलांना दिलेल्या वागणुकीबद्दल संताप व्यक्त होत आहे. आपल्या दोन मुलांना कारबाहेर उभं ठेऊन एक आई कारमध्ये तिच्या प्रियकरासोबत रोमान्स करत होती. अर्जेटिंनातील प्लाटा येथील पेरेयरा इराओला पार्कमध्ये ही घटना घडली.
महिलेनं तिच्या दोन लहान मुलांना कारच्या बाहेर उभं केलं आणि त्यांना वाट पाहण्यास सांगितलं. त्यानंतर कारचे दरवाजे बंद करून महिला तिच्या प्रियकरासोबत रोमान्स करू लागली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये ५ वर्षांची मुलगी तिच्या २ वर्षांच्या भावासोबत कारच्या बाहेर दिसत आहे. दोन्ही मुलं कारमध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही मुलं अतिशय त्रासलेली दिसत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मुलं कारमध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत होती. आपल्याला आत घेण्याची विनंती करत होती. मात्र महिलेनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मुलांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आतून बंद होता. तितक्यात तिथे पोलीस पोहोचले. त्यांनी कारमधील दोघांना अटक केली.
कारमध्ये महिलेसोबत असलेला पुरुष तिचा पती नसल्याची माहिती चौकशीदरम्यान पोलिसांना समजली. दोन्ही मुलांना सध्या केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा समावेश लवकरच आरोपींच्या यादीत केला जाईल.