आई - वडिलांना संपवले! भारतीय दाम्पत्याची न्यूझीलंड येथे मुलाने केली निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 09:41 PM2021-04-01T21:41:23+5:302021-04-01T21:43:10+5:30

Double Murder : बांगेरा दांपत्याचा इंजिनीअर झालेला मुलगा शील (२३) आई वडिलांची हत्या करून स्वतःलाही भोसकून घेतली असल्याची गंभीर घटना न्यूझीलंड येथे घडली आहे. 

Mom - Dad finished! A child living in India was brutally murdered by a child in New Zealand | आई - वडिलांना संपवले! भारतीय दाम्पत्याची न्यूझीलंड येथे मुलाने केली निर्घृण हत्या 

आई - वडिलांना संपवले! भारतीय दाम्पत्याची न्यूझीलंड येथे मुलाने केली निर्घृण हत्या 

Next
ठळक मुद्दे एल्सी बांगेरा (५५) आणि त्यांचे पती हर्मन बांगेरा (६०) अशी या दाम्पत्याची नावं आहेत. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. 

मूळच्या कर्नाटकातल्या मंगळुरूतील असलेल्या एका दाम्पत्याला भोसकून हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना न्यूझीलंडमधल्या ऑकलंड येथे घडली. एल्सी बांगेरा (५५) आणि त्यांचे पती हर्मन बांगेरा (६०) अशी या दाम्पत्याची नावं आहेत. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. 

बांगेरा दांपत्याचा इंजिनीअर झालेला मुलगा शील (२३) आई वडिलांची हत्या करून स्वतःलाही भोसकून घेतली असल्याची गंभीर घटना न्यूझीलंड येथे घडली आहे.  जखमी असलेल्या स्थितीत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तो आता मृत्यूशी झुंज देत आहे.  या घटनेने बांगेरा यांचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांना धक्का बसला. बांगेरा यांच्या शेजारी राहणाऱ्या गुप्ता यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा शील (२३) याने अभियंता पदवी घेतल्यानंतर दुसऱ्या देशात जाऊन स्वतंत्रपणे जगण्याचे ठरविले. “यामुळे पालक आणि मुलगा यांच्यात वाद निर्माण होई. काही दिवसांपूर्वी या विषयावरून तीव्र वादावादी झाली होती, यादरम्यान संतप्त शीलने त्याच्या दोन्ही पालकांना चाकूने भोसकून ठार मारले. नंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ऑकलंडच्या रूग्णालयात दाखल केले आहे.”


२००६ मध्ये बांगेर दाम्पत्य न्यूझीलंडला आले

बुधवारी सकाळी एल्सी बांगेरा (५५) आणि त्यांचे पती हर्मन बांगेरा (६०) यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळुरूमधील एका नातेवाईकाने सांगितले की, “ एल्सी बांगेरा (५५) आणि त्यांचे पती हर्मन बांगेरा (६०) हे  दोघेही मंगळुरुचे आहेत. अशी माहिती द न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. 

Web Title: Mom - Dad finished! A child living in India was brutally murdered by a child in New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.