शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बिअर बार मालकाच्या मित्रांकडून दृष्कृत्य, डान्सरने छतावरुन घेतली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 08:31 IST

रोहिणी सेक्टर 9 च्या नॉर्थ एक्स मॉलमधील बिअर बार (मास्टर द पार्टी हॉल) मध्ये खासगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत बुध विहार निवासी डान्सर निशा आणि त्यांची लहान बहिण राखी उर्फ तान्या डान्स करण्यासाठी आल्या होत्या.

ठळक मुद्देबार मालकांच्या मित्रांकडून होणाऱ्या अश्लील गैरवर्तनापासून स्वत:ची इज्जत वाचविण्यासाठी राखीने इमारतीच्या 5 व्या मजल्यावरुन उडी घेतली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या राखी आणि निशाला आंबेडकर रुग्णालयाबाहेर सोडून आरोपींनी तेथून पळ काढला

नवी दिल्ली - मनमानी करणारा बिअर बारचा मालिक आणि त्याच्या मित्रांच्या वाईट नजरेतून स्वत:चा बचाव करण्यासाठी एका प्रोफेशनल डान्सरने इमारतीच्या छतावरुन उडी घेत आपला जीव दिला. राखी असे या डान्सरचे नाव असून ती दिल्लीतील बुध विहार येथील रहिवाशी आहे. डान्सरच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरुन बार मालक विजय आणि त्याच्या मित्रांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. 

रोहिणी सेक्टर 9 च्या नॉर्थ एक्स मॉलमधील बिअर बार (मास्टर द पार्टी हॉल) मध्ये खासगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत बुध विहार निवासी डान्सर निशा आणि त्यांची लहान बहिण राखी उर्फ तान्या डान्स करण्यासाठी आल्या होत्या. या पार्टीत बारचे मालक विजय यांनी दोन्ही डान्सर्संना तब्बल 5 तास डान्स करायला लावला. त्यानंतर, साधारण साडे चार वाजता दोन्ही बहिणीकडे घराकडे निघाल्या असता, बार मालक आणि त्यांच्या मित्रांनी दोघींना रोखले. तसेच, पुन्हा डान्स करण्याची जबरदस्तीही केली. यावेळी, राखीने थांबण्यास नकार दिला असता, तिला गराडा घालून तिच्याशी अश्लील वर्तन करण्यात आल्याचे राखीची बहिणी निशाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

बार मालकांच्या मित्रांकडून होणाऱ्या अश्लील गैरवर्तनापासून स्वत:ची इज्जत वाचविण्यासाठी राखीने इमारतीच्या 5 व्या मजल्यावरुन उडी घेतली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या राखी आणि निशाला आंबेडकर रुग्णालयाबाहेर सोडून आरोपींनी तेथून पळ काढला. रुग्णालयात डॉक्टरांनी राखीला मृत घोषित केले. त्यामुळे, शवविच्छेदनानंतर पोलिसांनी राखीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यान, पोलिसांकडून बार मालकाची कसून चौकशी करण्यात येत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत.      

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्लीdanceनृत्य