उल्हासनगरात अल्पवयीन मुलीची छेड, पोक्सो अंतर्गत गुन्हा, आरोपी गजाआड
By सदानंद नाईक | Updated: October 1, 2024 18:04 IST2024-10-01T18:04:08+5:302024-10-01T18:04:24+5:30
उल्हासनगर पूर्व येथील एका नामांकित शाळेतील मुलगी कपडे बदलण्यासाठी मैत्रीणीसह आली होती.

उल्हासनगरात अल्पवयीन मुलीची छेड, पोक्सो अंतर्गत गुन्हा, आरोपी गजाआड
उल्हासनगर : शहर पूर्वेतील एका नामांकित शाळेत सोमवारी अल्पवयीन मुलीची सुरक्षा रक्षकाने छेड काढल्याचा प्रकार उघड होऊन, याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे.
उल्हासनगर पूर्व येथील एका नामांकित शाळेतील मुलगी कपडे बदलण्यासाठी मैत्रीणीसह आली होती. तेव्हा सुरक्षारक्षकाने शाळेतील बॅनर्सच्या आड कपडे बदलण्यास सांगितले. कपडे बदलल्यानंतर सुरक्षा रक्षकाने शेरेबाजी केल्याचा राग मुलीला येऊन तिने झालेला प्रकार पालकांना सांगितला. मनसे पदाधिकाऱ्यांना हा प्रकार माहीत झाल्यावर त्यांनी हिललाईन पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच, सुरक्षारक्षकाला याबाबत जाब विचारात मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. शाळा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, असा प्रकार शाळेत झाला नाही. तसेच तक्रार करणारी मुलगी शाळे शेजारील शिकवणी वर्गातील आहे. तर हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी हा विषय संवेदनशील असल्याने, याबाबत चौकशी केल्यानंतर बोलतो. असे म्हणाले. मात्र गुन्हा दाखल झाल्याची कबुली दिली.