धक्कादायक! आईचं काळीज बाहेर काढलं; प्रसिद्ध इन्स्टाग्राम मॉडेल एनानं चाकूने केली क्रूर हत्या
By प्रविण मरगळे | Updated: December 18, 2020 13:04 IST2020-12-18T12:53:42+5:302020-12-18T13:04:51+5:30
एनावर अद्याप कोणत्याही आरोपाची पुष्टी झाली नाही, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आईच्या हत्येत एना प्रमुख संशयित असल्याचं पोलिसांचे म्हणणं आहे.

धक्कादायक! आईचं काळीज बाहेर काढलं; प्रसिद्ध इन्स्टाग्राम मॉडेल एनानं चाकूने केली क्रूर हत्या
पूर्व युरोपीय देश मॉल्डोवा येथे राहणाऱ्या २१ वर्षीय इन्स्टाग्राम मॉडेल एना लेकोविचने स्वत:च्या आईची निर्घुण हत्या केली आहे. एनानं किचनमध्ये वापरण्यात येणाऱ्या चाकूने वार करून आईचं ह्दय आणि अन्य अवयव शरीरापासून वेगळे केले, यात तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात एना लेकोविचला अटक केली आहे. एनानं आई प्रस्कोव्या लेकोविच हिची हत्या केली आहे.
एनावर अद्याप कोणत्याही आरोपाची पुष्टी झाली नाही, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आईच्या हत्येत एना प्रमुख संशयित असल्याचं पोलिसांचे म्हणणं आहे. मात्र आतापर्यंत ही हत्या का करण्यात आली याचं कारण अस्पष्ट आहे. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार एनाने किचनमध्ये वापरण्यात येणाऱ्या चाकूने पहिल्यांदा स्वत:च्या आईवर वार केला त्यानंतर तिचं ह्दय आणि अन्य अवयव कापून शरीरापासून वेगळे केले, या निर्दयी प्रकारानंतर आईचा जागीच मृत्यू झाला.
२१ वर्षीय एना लेकोविच ही वैद्यकीय शिक्षण घेणारी तरूणी असून इन्स्टाग्रामवर ती प्रसिद्ध आहे. एनाचे इन्स्टाग्रामवर १६ हजाराहून जास्त फॉलोअर्स आहे, ती नेहमी तिचे हॉट आणि सुंदर फोटो शेअर करत असते, या फोटोला हजारोने लाईक्स मिळतात. तर एनाची आई प्रस्कोव्या लेकोविच यांचे वय ४० असून त्या जर्मनी येथे नोकरीला असतात. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार एनाच्या आईला संशय आला होता की, आपली मुलगी ड्रग्सच्या आहारी गेली आहे त्यामुळे तिच्या उपचारासाठी ती आली होती. हत्येमागे हे प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे.
एनाच्या काकाने या आरोपावर सांगितले की, प्रस्कोव्या मुलगी एनावर खूप प्रेम करत होती, ती जास्तीत जास्त वेळ एनासोबत घालवण्यासाठी प्रयत्न करत होती, पोलिसांनी अवघ्या २ तासात एनाला मुख्य संशयित म्हणून अटक केली, मी याबाबत कल्पनाही करू शकत नाही की एनाने तिच्या आईची हत्या केली असेल. याच दरम्यान एनाचा व्हिडीओ समोर आला, ज्यात पोलीस एनाला कोर्टात हजर करण्यासाठी पोहचली होती, यावेळी पत्रकाराने प्रश्न विचारला की, तुम्ही स्वत:च्या आईची हत्या करून तिचे अवयव वेगळे केले? यावर एनानं हसत हसत गुडबाय म्हणून उत्तर दिलं.