शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

पंढरपूर, सांगली, सोलापुरात दहशत माजविणाऱ्या पाच जणांच्या टोळीला 'मोक्का'

By appasaheb.patil | Updated: July 20, 2023 20:43 IST

मारामारी, खून, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश

पंढरपूर:  पंढरपुर शहर व तालुका, सांगोला, मिरज, सांगली, सोलापुर शहर पोलीस ठाणे हददीमध्ये गंभीर गुन्हे करून समाजामध्ये अशांतता व दहशतीचे वातावरण निर्माण करून सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत करून दहशत माजविणाऱ्या पाच जणांच्या एका टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमाचे (मोक्का) विविध कलमान्वये कारवाई केली आहे. टोळीप्रमुख प्रतिक उर्फ बबलु हरिभाउ प्रक्षाळे (वय ३२, रा. भटुंबरे, ता. पंढरपूर) व टोळी सद्यस सोमनाथ दिगंबर खंकाळ (वय ३९, रा. गणेश नर्सरी जवळ, गजानन नगर, पंढरपूर), निखील कृष्णा राजुरकर, (वय ३२, रा. हणुमान नगर, टाकळी रोड, पंढरपूर), रविंद्र हरिभाउ गुरव (वय ४२, रा. रुक्मिणी विद्यापीठ शेजारी, रेल्वे स्टेशन जवळ, पंढरपूर), विक्रांत दशरथ माने (रा. पढरपूर जि. सोलापूर) यांनी मारामारी, खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणी करणे, वाळु चोरी, अपहरण करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, चोरी, जबरी चोरी करणे, घरात घुसून मारहाण करणे, सरकारी नोकरावर हल्ले करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. यामुळे त्यांच्या विरूध्द पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलींद पाटील यांनी  मोका प्रस्ताव तयार केला.

त्या प्रस्तावास कोल्हापुर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमाचे (मोका) कायदयाअंतर्गत विविध कलमान्वये कारवाई करण्याची मंजुरी मिळाले. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी या गुन्हयाचा अधिक तपास करून यातील टोळीप्रमुख व टोळी सदस्य यांच्याविरूध्द अंतिम दोषारोपपत्र पाठविण्याची महाराष्ट्र राज्य मुंबई अतिरिक्त पोलीस महासंचालकांची यांची अंतिम मंजुरी घेतली. टोळीप्रमुख व टोळीसदस्य यांचेविरूध्द मोका न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक मिलींद  पाटील, पोसई हमीद शेख, पोहेकॉ शिवाजी पाटील, पोना सचिन तांबिले, पोकॉ राहुल लोंढे यांनी केलेली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरCrime Newsगुन्हेगारीSangliसांगली