शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खाकीतील दुर्गांनी मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 17:24 IST

सोमवारी रात्री २ ते २. ३० वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी डाव साधत गोरेगावातील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बस स्टॉपजवळ एका पादचाऱ्यास मारहाण करून जखमी केले आणि त्याच्याकडील मोबाईल फोन लंपास केला. चोरी करुन पळ काढणाऱ्या दोन चोरांना मुंबई पोलिसांच्या दोन महिला पोलिसांनी पाठलाग करुन अटक केली.

मुंबई - नुकतेच महिला पोलीस कर्मचारी मनिषा विसपुते यांनी कर्तव्य बजावत असताना माणुसकी दाखवत एका पोलिसाचे प्राण वाचविले. तर काल रात्री उशिरा आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना महिला अंमलदार महिला पोलिस शिपाई सोनी मराठे आणि वर्षा शिंदे यांनी विरवाणी बस स्टॉप गोरेगाव (पूर्व)येथे एका पादचाऱ्याला मारून त्याच्या ताब्यातील मोबाईल आणि पैसे काढून पळून जात असलेल्या दोन सराईत चोरांचा शिताफीने पाठलाग केला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी समाजकंटकांच्या मुसक्या बहाद्दुरीने आवळल्या आहेत. त्यामुळे पोलीस दलात या खाकीतील दोन दुर्गांचे  म्हणून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे आरे या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखील महिला असून त्यांचं नावं विजयालक्ष्मी हिरेमठ आहे.

सोमवारी रात्री २ ते २. ३० वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी डाव साधत गोरेगावातील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बस स्टॉपजवळ एका पादचाऱ्यास मारहाण करून जखमी केले आणि त्याच्याकडील मोबाईल फोन लंपास केला. चोरी करुन पळ काढणाऱ्या दोन चोरांना मुंबई पोलिसांच्या दोन महिला पोलिसांनी पाठलाग करुन अटक केली. आरे येथे रात्रपाळीला पोलीस मोबाईल व्हॅन क्रमांक ५ वर पोलीस शिपाई सोनी मराठे आणि वर्षा शिंदे या कर्तव्य बजावत होत्या. गस्त घालत असताना या दोघींना गोरेगाव पूर्व येथील विरवाणी बसस्टॉपजवळ एका व्यक्तीवर दोन जण हल्ला करताना दिसले. हल्लेखोरांनी एका पादचाऱ्याच्या डोक्यात वार करुन त्याला जखमी करुन त्याच्याकडून मोबाईल व पैसे घेऊन पळ काढत होते. थोडाही वेळ न दवडता समयसूचकता दाखवत घटनास्थळी पोहोचलेल्या या दोघींनी शिताफीने या दोन सराईत चोरांचा पाठलाग करुन त्यांना अटक केली. जखमी पादचाऱ्यालाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघींनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे पादचाऱ्यांचे प्राण तर वाचलेच शिवाय दोन सराईत चोरांनाही अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. या कामगिरीमुळे मुंबई पोलीस दलातील या दोन्ही नवदुर्गांचे कौतुक होत आहे.

खाकीतील नवदुर्गा; महिला पोलिसाच्या तत्परतेनं वाचले सहकाऱ्याचे प्राण

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस