शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पासवर्ड टाकता न आल्याने मोबाईल चोरटे जाळयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 14:32 IST

चोरीचा मोबाईल असल्याने त्यांना पासवर्ड टाकता आला नाही आणि इथेच सारा घोळ झाला..

ठळक मुद्देगस्तीवरील चिखली पोलिसांची कारवाईपोलिसांनी काही तासातच चोरट्यांचा घेतला शोध

पिंपरी : मंडई परिसरात चिखली पोलिसांना दोनजण संशयितरित्या आढळून आले असताना त्यांना हटकले. पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यातल्या एकाकडे मोबाईल निदर्शनास आला. पोलिसांनी पासवर्ड टाकून मोबाईल स्क्रीन उघडण्यास सांगितले. मात्र, चोरीचा मोबाईल असल्याने त्यांना पासवर्ड माहित नव्हता. ते मोबाईल स्क्रिन उघडू शकले नाहीत. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, चोरीचा मोबाईल असल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीुनसार, चिखली पोलिसांनी नाकाबंदी केली असता, दोनजण शनिवारी रात्री चिखलीतील मंडईजवळ दुचाकीवरून संशयितरित्या वावरत होते. गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक संदीप बांदल यांच्या पथकाने त्या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहताच त्यांनी तेथून धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले. त्यांची अंगझडती घेतली. त्यांच्यापैकी एकाकडे मोबाईल मिळाला. तो चोरीचा असल्याची कबुली त्यांनी दिली. विशाल बाबुराव पांचाळ, विशाल राजू धोत्रे (इंदिरानगर, चिंचवड) अशी चोरट्यांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी रात्री केएसबी चौकातून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी विनोद रामनवल चौहान (वय २७, रा. कुदळवाडी) यांच्या हातातील अंदाजे सात हजार रुपये किंमतीचा मोबाइल हिसकावला होता. या प्रकरणी त्यांनी शुक्रवारी चिखली पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती.शुक्रवारी रात्री मोबाईल हिसकावण्यात आला. शनिवारी रात्री चिखली पोलिसांनी चौहान यांचा मोबाईल चोरणाऱ्या चोरटयांना जेरबंद केले. चिखली पोलिसांनी काही तासातच चोरट्यांचा शोध घेतला. ज्यांचा मोबाईल चोरीस गेला होता. त्यांना तो मोबाईल मिळवुन दिला. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलtheftचोरीArrestअटक