शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Mobile Thief Gang: मुंबई-जयपूर हायवेवर 'धूम-स्टाइल' चोरी, धावत्या कंटेनरमधून 1 कोटींचे मोबाइल लंपास; लॉन्च पण झाले नव्हते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 13:53 IST

याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून 227 5G अँड्रॉइड फोन, तीन पिस्तूल आणि 12 जिवंत गाडतुसे जप्त केली आहेत.

अलवर: जयपूर-मुंबई हायवेवर मोबाईल चोरीची मोठी घटना घडली आहे. धावत्या ट्रकमधून तीन दरोडेखोरांनी 1 कोटी किमतीचे 227 स्मार्टफोन चोरले. पण, अलवर जिल्ह्यातील मलाखेडा पोलिसांनाना या टोळीतील तीन जणांचा मुसक्या आवळण्यात यश आले. तसेच, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले 227 अँड्रॉइड मोबाईल फोन, तीन देशी बनावटीची पिस्तूल आणि एक डझन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

नवीन 5G फोन्सची चोरीमिळालेल्या माहितीनुसार, या टोळीकडून जप्त केलेले सर्व मोबाईल 5G चे असून, या फोनची अद्याप मार्केटमध्ये विक्री सुरुही झालेली नाही. हे आरोपी अतिशय हुशार असून, त्यांनी धावत्या कंटेनरमधून हे मोबाईल चोरल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सध्या पोलीस पकडलेल्या तिघांची चौकशी करत आहेत.

एक कोटींचे मोबाईलपोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, जयपूर-मुंबई महामार्गावर धावत्या कंटेनरमधून हे मोबाईल लुटले. या मोबाईलची बाजारातील किंमत 1 कोटींच्या आसपास आहे. साजिद उर्फ ​​काला(रा.दुडोली हरियाणा), अनिश आणि जब्बार(रा.जयपूर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत, तर मोहम्मद, आसिफ आणि अब्बास हे तिघे फरार झाले आहेत. सध्या पोलीस या तिघांची चौकशी करत आहेत. या चोरट्यांकडून इतर अनेक मोठ्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

असे पकडले चोरटेएसपी गौतम यांनी सांगितल्यानुसार, मालाखेडा पोलीस ठाण्याला या टोळीतील लोक मंगळवारी रात्री आल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यावर पोलिसांनी रात्री उशिरा हळदीना चौकात वाहनांची तपासणी सुरू केली. यादरम्यान पोलिसांना अलवरच्या बाजूने एक कार येताना दिसली. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र कार चालकाने गाडी पुढे करून परत नेण्यास सुरुवात केली. त्यावर पोलिसांनी त्याला घेराव घातला आणि त्या गाडीतून तिघांसह मुद्देमाल जप्त केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSmartphoneस्मार्टफोनRobberyचोरीPoliceपोलिस