शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील १७ सेक्शन चौकात तलवारी घेऊन टोळक्यांचा धिंगाणा, तरुणावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 19:12 IST

Crime News : उल्हासनगर कॅम्प नं-३, १७ सेक्शन चौकातील चहा टपरीवर कमल कनोजिया यांचा चौघाडीतील एका तरुणाला ४ नोव्हेंबर रोजी रात्री धक्का लागला.

सदानंद नाईक

उल्हासनगर : शहरातील १७ सेक्शन चौकात चहाच्या टपरीवर धक्का लागल्याच्या कारणावरून चौघाडीने, एका तरुणावर हल्ला केला. टोळक्याने भर चौकात तलवारी नाचवीत धिंगाणा घातला असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यापैकी दोघाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, १७ सेक्शन चौकातील चहा टपरीवर कमल कनोजिया यांचा चौघाडीतील एका तरुणाला ४ नोव्हेंबर रोजी रात्री धक्का लागला. यातून त्यांच्यात वाद झाल्यावर संतप्त चार जणांच्या टोळक्याने तलवारी सारखे घातक शस्त्र नाचवीत कमल कनोजिया याच्यावर हल्ला केला. याप्रकारने चौक परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून गंभीर जखमी झालेल्या तरुणावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मारहाण प्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. ज्या तरुणावर हल्ला झाला. त्या तरुणाची पाश्वभूमी गुन्हेगारीवृत्तीची असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकारने शहरातील गुन्हेगारीची चर्चा पुन्हा रंगली असून पोलिसांनी गुन्हेगारांवर आपला वचक बसविण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिस