शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या पदाधिकाऱ्याने उल्हासनगर प्रांत अधिकाऱ्याच्या गाडीवर केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 20:14 IST

Crime News : मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी प्रांत अधिकारी यांच्या गाडीवरील हल्ल्याचा निषेध केला असून पक्षश्रेष्ठी पुढील निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहे.

ठळक मुद्देउल्हासनगर प्रांत कार्यालय प्रांगणात उभ्या असलेल्या प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या गाडीवर मनसे विभाग प्रमुख योगीराज देशमुख यांनी दुपारी दगडाने हल्ला केला.

सदानंद नाईक

उल्हासनगर : प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या गाडीवर मनसे विभाग प्रमुख योगीराज देशमुख यांनी दुपारी दगडाने हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. सरकारी आरक्षित भूखंडावर बांधकाम होत असल्याच्या तक्रारींची दखल न घेतल्याने, ही कृती केल्याची कबुली देशमुख यांनी दिली. तर देशमुख कोरोना काळात भेटले नसून त्यांच्या तक्रारी प्रलंबित नसल्याची प्रतिक्रिया गिरासे यांनी पत्रकारांना दिली आहे.उल्हासनगर प्रांत कार्यालय प्रांगणात उभ्या असलेल्या प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या गाडीवर मनसे विभाग प्रमुख योगीराज देशमुख यांनी दुपारी दगडाने हल्ला केला. हल्ल्यात गाडीची काच फुटली आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून याविरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे संकेत प्रांत अधिकारी गिरासे यांनी दिली. दरम्यान योगीराज देशमुख यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून यामध्ये राज्य शासनाच्या आरक्षित भूखंडावर शासनाचा नाम फलक लावला असताना अवैध बांधकाम सुरू आहेत. अशी तक्रार प्रांत कार्यालयाकडे केली. मात्र या तक्रारीकडे प्रांत अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत असून मला कार्यालयात येण्यास मज्जाव केल्याचे व्हिडीओत म्हटले. मंगळवारी याबाबत विचारणा करण्यासाठी प्रांत कार्यालयात गेल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यानिषेधार्थ प्रांत अधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला केल्याची कबुली दिली आहे.प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी मात्र योगीराज यांचे आरोप फेटाळून गेल्या कोरोना काळात आपल्याकडे आलेच नाही. तसेच त्यांचे कोणतेही अर्ज अथवा तक्रार प्रलंबित नसल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र योगीराज देशमुख यांच्या हल्ल्याने, प्रांत कार्यालयातील कारभारावर टीकेची झोळ उठली आहे. प्रांत कार्यालयाने शहरातील खुल्या जागा, विविध शासकीय कार्यालयाच्या जागेवर सनद दिल्याने, त्या वादात सापडल्या असून याबाबत प्रांत कार्यालयावर गेल्या वर्षी राजकीय पक्ष व सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला होता. तसेच दिलेल्या सनदेच्या चौकशीची मागणी केली होती. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी प्रांत अधिकारी यांच्या गाडीवरील हल्ल्याचा निषेध केला असून पक्षश्रेष्ठी पुढील निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहे.योगीराज देशमुख यांना अटक प्रांत अधिकारी यांच्या गाडीवरील हल्ल्याचा शहरातून निषेध व्यक्त होत असून प्रांत अधिकारी यांच्या तक्रारीवरून योगीराज देशमुख यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डी टी टेळे यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMNSमनसेPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर