भिवंडी - पत्नीस गावाला पाठवून अनैतिक संबंधास बाधा आणलेल्या मित्राची हत्या करणाऱ्या गोदाम कामगारास पोलिसांनी २४ तासांत गजाआड केले. ही घटना दापोडा गावातील असून ग्रामपंचायतीने गावात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे आरोपीस पकडणे शक्य झाले.पारसनाथ कांता साहू (२७) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो दापोडा गावातील चाळीत आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याच चाळीत रामधनी ऊर्फ पंचम छगुर गुप्ता (२५) हा आपल्या चार साथीदारांसह राहत होता. त्याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण पारसनाथ याला लागली असता त्याने पत्नीला मध्य प्रदेशमध्ये गावाला पाठवून दिले. त्याचा राग आल्याने रामधनी याने मंगळवारी रात्रीच्यावेळी पारसनाथ याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. त्यामुळे पारसनाथ गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत म्हणून जाहीर केले. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.कंपनीतून पळून कल्याण येथे उत्तर प्रदेश येथे जाणारी रेल्वे पकडण्यासाठी थांबला होता. तेथे पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.
अनैतिक संबंधांतून मित्राची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 03:27 IST