वैयक्तिक आयडीचा गैरवापर, एजंटगिरी करणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी पकडले!
By रूपेश हेळवे | Updated: September 21, 2023 16:23 IST2023-09-21T16:23:14+5:302023-09-21T16:23:40+5:30
एक आरोपी हा आपल्या वैयक्तिक आयडीचा वापर करून अनेक तिकीट काढत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली.

वैयक्तिक आयडीचा गैरवापर, एजंटगिरी करणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी पकडले!
सोलापूर : वैयक्तिक आयडीने रेल्वेचे तिकीट काढून देत एजंटगिरी केल्याप्रकरणी एका इसमावर रेल्वे पोलिसांनी कारवाई केली आहे. त्या इसमाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून १० हजाराचे तिकीट जप्त करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. रघुनंदन सतीश चिटकेन ( वय ३९, रा. सुवर्ण कलश अपार्टमेन्ट, गड्गी नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
एक आरोपी हा आपल्या वैयक्तिक आयडीचा वापर करून अनेक तिकीट काढत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे रेल्वे पोलिसांनी एमआयडीसी परिसरातील आरोपीच्या दुकानी गेले. तेथे आरोपीजवळ विविध सहा युजर आयडी पोलिसांनी जप्त केले. त्याच्याकडून एकूण चालू ८ तिकीट जप्त करण्यात आले व वापरण्यात आलेल्या ३३ तिकीट असे एकूण जवळपास साठ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शिवाय आरोपीवर रेल्वे अधिनियम १४३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पीएसआय मुकेशकुमार दहिरे, पाेलिस उपनिरीक्षक सतीश पोटभरे व त्यांच्या पथकाने केली.