शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बँकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची ‘मिसिंग मिस्ट्री’; रक्ताने माखलेली कार नवी मुंबईतून केली जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 09:13 IST

कमला मिलमध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेतील प्रशासकीय अधिकारी अचानक गायब झाला. त्यांचा शोध सुरू असतानाच, शुक्रवारी नवी मुंबईत त्यांची कार रक्ताने माखलेली आढळल्याने खळबळ उडाली.

- मनीषा म्हात्रेमुंबई : कमला मिलमध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेतील प्रशासकीय अधिकारी अचानक गायब झाला. त्यांचा शोध सुरू असतानाच, शुक्रवारी (७ सप्टेंबर) नवी मुंबईत त्यांची कार रक्ताने माखलेली आढळल्याने खळबळ उडाली. या मिसिंग मिस्ट्रीचा उलगडा करण्यासाठी एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित थोरात स्वत: हे प्रकरण हाताळत आहेत.

मलबार हिल परिसरात सिद्धार्थ संघवी (३७) हे पत्नी, ९ वर्षांचा मुलगा आणि आईवडिलांसह राहतात. ते लोअर परळच्या कमला मिलमधील एचडीएफसी बँकेच्या शाखेत प्रशासकीय अधिकारी आहेत. सकाळी १० ते रात्री ८ ही त्यांची कामाची वेळ आहे. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कारने ते कामाला आले. कामकाज उरकून सायंकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान ते निघाले. या वेळी तेथील सुरक्षारक्षकांनी त्यांना कारमधून बाहेर जाताना पाहिले होते. तेथूनच पुढे ते नॉट रिचेबल झाले.

रात्री उशिर झाला म्हणून कुटुंबीयांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन बंद होता. त्यांनी मित्र, नातेवाइकांकडे चौकशी केली. रात्रभर वाट पाहिली. मात्र, काहीच पत्ता न लागल्याने गुरुवारी पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, शुक्रवारी त्यांची कार नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात रक्ताने माखलेली आढळली. पोलिसांचे एक पथक नवी मुंबईला रवाना झाले. त्यांनी कार ताब्यात घेत, त्रात्री उशिरा ती मुंबईत आणली. पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या प्रकरणाताच तपास सुरू केला. शुक्रवारी सकाळपासून हे अधिकारी पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. गुन्हे शाखा कक्ष ३ ही या प्रकरणाचा समांतर तपास करत आहेत. संघवी यांचे वार्षिक उत्पन्न ४५ ते ५० लाख होते. त्यामुळे या मिसिंग मिस्ट्रीमागे आर्थिक वाद आहे का? या दिशेनेही पोलीस तपास सुरू आहे. त्यांच्या जवळच्या मित्र- मैत्रिणींकडेही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.मोबाइल सीडीआरद्वारे शोध

संघवी यांचा मोबाइल सीडीआर काढण्यात येत आहे. त्यांच्या शेवटच्या लोकेशनवरून तपास सुरू आहे. काही सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.तपास सुरू : संघवी यांची कार नवी मुंबईतून जप्त केली याला अपर पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दुजोरा दिला. वरिष्ठ प्रकरणाचा तपास करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी