पालघर - बोईसरच्या धोडी पूजा,जिल्हा परिषद शाळेच्या मागे राहणाऱ्या आयुष बलराम नायक (वय 5 वर्षे ) हा मुलगा ६ डिसेंबरपासून बेपत्ता होता. सदर मुलाचा मृतदेह आज हॉटेल रुचिरा विराजच्या मागे बोईसर येथील एका नाल्यात सापडल्याने चालून एकच खळबळ उडाली असून बोईसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
खळबळजनक! बेपत्ता चिमुकल्याचा नाल्यात सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 15:15 IST