शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या अभियंत्यावर बोरिवलीत गोळीबार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 06:53 IST

नॅशनल पार्कजवळील घटना

ठळक मुद्देनॅशनल पार्कजवळील घटना

मुंबई : मीरा-भाईंदर महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार होण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी बोरिवली परिसरात घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून गोळी कारला लागल्याने कार्यकारी अभियंते थोडक्यात वाचले. नुकत्याच ठाणे येथील कल्पिता पिंपळेंवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर हा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

बोरिवली पूर्वच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरील कृष्णा इमारतीजवळ कार्यकारी अभियंते दीपक खांबित हे त्यांच्या कारमध्ये असताना रेनकोट घातलेल्या दोन अनोळखी मोटारसायकलस्वारांनी त्यांच्यावर गोळीबार केला. संध्याकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास खांबीत हे मीरा-भाईंदर महापालिकेच्या कार्यालयातून त्यांच्या बोरिवली येथील घरी परतत असताना हा प्रकार घडला. 

हल्लेखोरांनी खांबित यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या.  मात्र, सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकल्याने ते बचावले. या गोळीबाराची माहिती मिळताच कस्तुरबा पोलीस, तसेच परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी आणि वरिष्ठांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खांबित यांच्यावर हल्ला करणारे कोण, याची चौकशी करण्यासाठी त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. त्यांना कोणाकडून धमकी मिळाली होती का, याचीही माहिती घेतली जात आहे. 

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही पडताळले जात आहेत. घटनास्थळाहून काडतुसाच्या पुंगळ्या पोलिसांनी हस्तगत करीत हल्ल्यासाठी नेमके कोणते अग्निशस्त्र वापरले गेले याचा शोध घेतला जात आहे. पोलीस आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.      

सुरक्षेबाबत प्रश्नचिन्हठाण्यातील सहायक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्यानंतर आता मुंबईत पालिका अधिकाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMumbaiमुंबईPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी