शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
3
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
4
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
5
महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
6
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
8
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
9
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
10
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
11
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
12
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
13
Pankaj Dhir: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
14
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
15
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
16
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
17
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
18
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
19
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
20
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा विधी संघर्ष बालकाचे मुंबईत होणार पुनर्वसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 20:27 IST

Crime News : तपास अधिकारी सुर्यवंशी व पवार यांनी घटना व पुरावे मंडळासमोर मांडल्याने या चौकशीत बालकाने गुन्हा केल्याचे सिध्द झाले आहे.

ठळक मुद्देया प्रकरणात वैदयकीय अधिका-यांचा पुरावा तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांस तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाची ठरली आहे.

धुळे : शिरपुर तालुक्यातील मुखेड येथे अवघ्या सात वर्षे वयाच्या बालिकेवर अत्याचार करणा-या एकास धुळयाच्या बाल न्याय मंडळाचे अध्यक्षा तथा न्यायाधिश गंगवाल शाह तसेच सदस्य यशवंत हरणे व ॲड अनिता भांबेरे यांनी दोषी धरले आहे.  या विधी संघर्ष बालकास दोन वर्षांसाठी मुंबई येथील शासकीय प्रशिक्षण संस्थेत पुनर्वसनासाठी पाठवण्याचे देखिल आदेशात नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात वैदयकीय अधिका-यांचा पुरावा तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांस तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाची ठरली आहे.

शिरपुर तालुक्यातील  मुखेड येथे रहाणा-या सात वर्षे वयाच्या या पिडीतेचे नातेवाईक 21 जानेवारी 2016 रोजी घरी नसल्याची संधी पाहुन 17 वर्षे वय असलेल्या या विधी संघर्ष बालकाने अत्याचार केला होता. याच दरम्यान पिडीतेचे दोन नातेवाईक घटनास्थळावर आले असता त्यांना अत्याचार करणारा मुलगा पळुन जात असतांना दिसुन आला. तर पिडीता गंभिर जखमी अवस्थेत आढळुन आली. त्यामुळे पिडीतेच्या नातेवाईकांनी शिरपुर पोलिस ठाणे गाठुन या घटनेची तक्रार दाखल केल्याने भादंवी कमल 376 ( 1) ( i) सह बालकांवर लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4, 6, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करुन विधी संषर्घ बालकाला ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा तपास तत्कालिन पोलिस निरीक्षक मंगलसिंग सुर्यवंशी व पोलिस निरीक्षक दत्तात्रय पवार यांनी करुन चौकशी अहवाल धुळयाच्या बाल न्याय मंडळासमोर सादर केला. या कामी बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा तथा प्रिंसीपल मॅजीस्ट्रेट गंगवाल शाह तसेच सदस्य यशवंत हरणे  व ॲड अनिता भांबेरे यांच्या समोर या तपासणी अहवालावर कामकाज चालवण्यात आले. सरकार पक्षाच्यावतीने तत्कालीन सरकारी वकील पी बी वाघ , आर पी चौधरी तसेच विशाल पाटील यांनी सरकार पक्षाच्यावतीने मंडळाच्या समोर 11 साक्षीदार सादर केले.  या कामी पिडीतेचे नातेवाईक असणारे साक्षिदार तसेच तपास अधिकारी यांनी या घटनेची सविस्तर माहीती दिली.  या खटल्याच्या चौकशीत पिडीतेची वैदयकीय तपासणी करणारे वैदयकीय महाविदयालयातील डॉ वैशाली पाटील तसेच शिरपुरचे डॉ भरत गोहील तर विधी सघर्ष बालकाची तपासणी करणारे वैदयकीय अधिकारी डॉ. कैलाससिंग राजपुत यांची महत्वाची साक्ष झाली. यात पिडीतेची वैदयकीय तपासणी केलेला दाखला तसेच विधी संघर्ष बालकाचा वैदयकीय तपासणी अहवाल मंडळापुढे वैदयकीय अधिकारी यांनी सविस्तरपणे साक्ष देतांना मांडला. तसेच तपास अधिकारी सुर्यवंशी व पवार यांनी घटना व पुरावे मंडळासमोर मांडल्याने या चौकशीत बालकाने गुन्हा केल्याचे सिध्द झाले आहे.

त्यानुसार मंडळाच्या अध्यक्षा गंगवाल शाह यांनी याप्रकरणाचा निकाल देण्यासाठी यापुर्वी झालेल्या अनेक न्यायनिवाडयांचे अवलोकन केले. यानंतर बालकास भादंवी कलम 376 ( 1) ( i) अन्वये दोषी धरण्यात आले आहे. त्यानुसार या बालकाची रवानगी दोन वर्षांसाठी मुंबई येथील डेविड ससुन प्रशिक्षण केंद्रात करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या कालावधीत या प्रशिक्षण केंद्रात या बालकाला पुनर्वसन कामी व्यावसायीक प्रशिक्षण देण्यात येणार असुन याचा अहवाल नियमितपणे धुळयाच्या बाल न्याय मंडळाला सादर करण्याचे देखिल आदेशात नमुद करण्यात आले आहे. 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाCourtन्यायालयDhuleधुळेPoliceपोलिस