शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी ९ आठवड्यांची गर्भवती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 18:17 IST

Sexual Abuse : तब्बल अकरा गुन्हे असलेल्या गुन्हेगाराने केला अत्याचार

ठळक मुद्देसंशयित मोहनसिंग जगदीशसिंग बावरी ( वय १९,रा. तांबापुरा, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली आहे.

जळगाव : घरफोडीचे तब्बल ११ गुन्हे असलेल्या गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. ती मुलगी नऊ आठवड्यांची गर्भवती राहिली आहे. दरम्यान, संशयित मोहनसिंग जगदीशसिंग बावरी ( वय १९,रा. तांबापुरा, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली आहे. पीडितेला बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आलेले आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातून १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता अल्पवयीन मुलगी गायब झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार ल्‍पनाबाई सुधाकर गवारे (रा. आयोध्या नगर जळगाव) या महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवदर्शनाला जातो असे सांगून कल्‍पनाबाई हिने पीडितेला पळवून नेले होते, असे तक्रारदारांचे म्हणणे होते पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोहनसिंग याने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात सोडून लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला पळवून नेले.दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता ती नऊ आठवड्याची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, त्यानुसार मोहनसिंग याच्याविरुद्ध बलात्काराचे वाढीव कलम लावण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ॲट्रॉसिटीचे कलम लावण्यात आलेले आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा व पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे या गुन्ह्याचा तपास करीत आहे.अटकेतील मोहनसिंग याला उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी मंगळवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे एडवोकेट पंढरीनाथ चौधरी यांनी बाजू मांडली. या गुन्ह्यातील अन्य आरोपी फरार असल्याने त्यांना अटक करण्याचे कारण सांगून पोलीस कोठडीची मागणी केली.

मोहनसिंग बावरी सराईत गुन्हेगारमोहनसिंग बावरी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे त्याच्याविरुद्ध घरफोडी, चोरी,  मारामारी, प्राणघातक हल्ला व खुनाचा प्रयत्न आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पेठ व रामानंदनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी तीन तर एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. आता अपहरण व बलात्काराचा हा सहावा गुन्हा या पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध १२ गुन्हे दाखल झालेले आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणJalgaonजळगावPoliceपोलिसArrestअटक