शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेत्याच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बलात्कार करून काढले डोळे आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 08:19 IST

Crime News: १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. नराधमांनी या मुलीवर आधी बलात्कार केला. त्यानंतर तिचे डोळे काढले. अखेरीस

रांची - अनेक कायदे, कठोर शिक्षा देऊनही समाजातील बलात्काराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. अशीच एक बलात्काराची धक्कादायक घटना रांची येथे घडली आहे. इथे काही नराधमांनी क्रौर्याच्या सर्व सीमा पार केल्या. राज्यातील पलामू जिल्ह्यातील भाजपाच्या स्थानिक नेत्याच्या १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. नराधमांनी या मुलीवर आधी बलात्कार केला. त्यानंतर तिचे डोळे काढले. अखेरीस ही आत्महत्या भासावी म्हणून तिचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत लटकवला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई प्रदीप कुमार सिंह नावाच्या आरोपील अटक केली आहे.  (Jharkhand Crime News)

ही घटना ७ जून रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित मुलगी सकाळी १० वाजता घराबाहेर गेली होती. ती परत आली नाही त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर पांकी येथील पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. मग पोलिसांनीही तपासास सुरुवात केली. मुलीला शोधून काढण्यासाठी शोधमोहीम सुरू असतानाच बुधवारी पोलिसांना लालीमाटी जंगलामध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह मिळाला. मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या चार मुली आणि एक मुलगा आहे. पैकी मोठ्या मुलीची या नराघमांनी हत्या केली. 

या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. या पोलिसांना घटनास्थळावर एक मोबाईल सापडला. त्या आधारावर पोलिसांनी प्रदीप नावाच्या आरोपीला अटक केली आहे. पांकी पोलीस ठाण्याचे प्रभारी अशोक कुमार यांनी सांगितले की, पीडितेच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्यासंदर्भात तक्रार दिली होती. पोलिसांनी याबाबतचा तपास सुरू केला होता. त्यानंतर जंगलातून या तरुणीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. तिची हत्या करून नंतर ही आत्महत्या असल्याचे भासवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. आता पोस्टमार्टेमच्या अहवालातून याबाबत अधिक माहिती समोर येईल. 

दरम्यान, आपल्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर तिचे डोळे फोडण्यात आले, असा आरोप पीडितेच्या पित्याकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंडBJPभाजपा