शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार, सावंतवाडीतील प्रकाराने सिंधुदुर्ग जिल्हा हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 00:18 IST

अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर तिघा नराधमांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सिंधुदुर्ग - सावंतवाडी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन तिघा युवकांनी शुक्रवारी मळगाव येथील एका लॉजवर तसेच रेल्वे स्टेशन परिसरात नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी  अत्याचारीत युवतीने शनिवारी सावंतवाडी पोलिसांकडे तक्रार नोदवल्यानंतर पोलिसांनी  कुडाळ येथील युवकाला ताब्यात घेतले आहे. तर अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.सावंतवाडी तालुक्यातील एका गावात राहाणा-या मुलीची फेसबुकवरून कुडाळ येथील एका युवकाशी ओळख झाली होती. ही ओळख होऊन बरेच दिवस झाले. त्या युवकाने तिला प्रेमाबद्दल विचारले पण तिने त्याला स्पष्ट शब्दात नाही असे सांगितले. मात्र शुक्रवारी दुपारी तीच मुलगी एका मित्रासोबत येथील शहरातील एका कोंल्ड्रीग हाऊसमध्ये दिसल्याने कुडाळ येथील तो युवक चांगला चक्रावला त्याने तुझे नाव आई वडिलांना सांगणार असे सागितले. त्यामुळे मुलगी चांगलीच घाबरली आणि तू नाव सांगू नको असे त्याला सतत विनवणी करत होती.कुडाळच्या त्या मित्राने नाव सांगत नाही तू माझ्या बरोबर चल मी तुला घरी सोडतो, असे म्हणत मळगाव येथील एका लॉजवर तिला घेऊन तेथे तिला थंड पेयातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार केला. रात्री साडे दहाच्या सुमारास कुडाळ मधील हा युवक लॉजमधून खाली आला. तेथे त्याचे दोन मित्र थांबले होते. त्यांच्या ताब्यात या मुलीला देउन मी दुचाकीत पेट्रोल भरून येतो तू येथेच थांब असे म्हणत निघून गेला तो पुन्हा आलाच नाही.त्याच वेळी त्या दोघा मित्रांनी तू आमच्या सोबत  रेल्वे स्टेशनवर चल तेथे थांबूया, असे म्हणत तिला घेऊन गेले आणि तिचा मोबाईल, पर्स काढून घेत तेथील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर पुन्हा दोघा युवकांनी अत्याचार केले. शनिवारी पहाटे त्या युवतीला जाग आली तेव्हा ती युवती घाबरली. मात्र तर ते युवकही फरार झाले होते. मग युवतीने आपल्या मित्राला फोन वरून सर्व कल्पना दिली. मग मित्रांने तिला मळगाव येथून घेऊन तिच्या घरी सोडले. हा सर्व प्रकार ऐकून अत्याचारित मुलीचे कुटूंब चांगलेच हादरून गेले.त्यानंतर दुपारी या घटनेची कल्पना सावंतवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अत्याचारित मुलीची तक्रार घेतल्यानंतर प्रथम कुडाळ येथील मुख्य आरोपीला ताब्यात घेतले तर अन्य दोघा युवकांचा पोलीस शोध घेत आहेत. हे दोन्ही युवक युवतीच्या ओळखीचे नाहीत. तर ताब्यात घेतलेला आरोपीही त्या मुलांची नावे सांगत नाहीत. आपण त्यांना ओळखत नसल्याचा आव आणत आहे. त्यामुळे पोलीस चांगलेच चक्रावून गेले आहेत. दरम्यान मुलगी अल्पवयीन असल्याने तक्रारीनंतर आरोपींवर अल्पवयीन अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.पोलिसांनी आरोपीने वापरलेली दुचाकी ताब्यात घेतली आहे. तसेच ज्या लॉजवर या मुलीवर घेऊन गेला त्या लॉजच्या रूमची झाडाझडती पोलिसांनी घेतली आहे. या घटनेचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वाती यादव करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारsindhudurgसिंधुदुर्ग