शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

घरासमोर बसलेल्या अल्पवयीन मुलीवर कारमधून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 21:49 IST

Firing Case : गोळ्यांच्या आवाजाने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी मुलीला रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

ठळक मुद्दे ही घटना झारखंडची राजधानी रांची येथील आहे. हल्लेखोरांनी दिवसा ढवळ्या एका मुलीवर जीवघेणा हल्ला केला आहे.

घरासमोर बसलेल्या एका अल्पवयीन मुलीवर कारमधून आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. हा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात खळबळ माजली. या हल्ल्यात मुलीला दोन गोळ्या लागल्या आहेत. गोळ्यांच्या आवाजाने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी मुलीला रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना झारखंडची राजधानी रांची येथील आहे. हल्लेखोरांनी दिवसा ढवळ्या एका मुलीवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात संबंधित मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. १४ वर्षीय रुचीच्या पायाला आणि हाताला गोळी लागली आहे. ही घटना रांचीच्या पंडरा ओपी परिसरात घडली आहे. पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडरा ओपी येथे कारमधून आलेल्या तीन हल्लेखोरांनी रुची कुमारी नावाच्या एका अल्पवयीन मुलीवर गोळ्या झाडल्या आहेत. या गोळीबारात रुचीला दोन गोळ्या लागल्या आहेत. गोळ्या लागल्यानंतर ती जमिनीवर कोसळली. दरम्यान बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजाने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. इतक्यात हल्लेखोर कारमध्ये बसून फरार झाले आहे. जखमी रुचीनं सांगितले, ती घराच्या बाहेर बसली होती, तेव्हा कारमधून तीन हल्लेखोर आले आणि त्यांनी तिच्यावर गोळीबार सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रुची कुमारीचे मामा विकास सिंह यांना गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून त्यांची तुरूंगात रवानगी केली आहे. त्यामुळे या गांजा कनेक्शनच्या वादातूनच हा हल्ला झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे पंडारा परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती न्यूज १८ने दिली आहे. 

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसJharkhandझारखंड