सोनपेठ येथे अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 17:32 IST2018-08-24T17:31:48+5:302018-08-24T17:32:43+5:30

एक अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवत दोन वर्षांपासून बलात्कार केल्याची घटना तालुक्यातील डिघोळ येथे उघडकीस आली

Minor girl raped in Sonpeth from two years | सोनपेठ येथे अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार

सोनपेठ येथे अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार

सोनपेठ (परभणी) :  एक अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवत दोन वर्षांपासून बलात्कार केल्याची घटना तालुक्यातील डिघोळ येथे उघडकीस आली आहे. याप्रकणी पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दोन वर्षापासून डिघोळ येथील मुंजा मुंगे (१९ ) याचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत २ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यातच त्याने पिडीतेवर लैंगिक अत्याचार केले. यामुळे पिडीता गर्भवती राहिली. तिने १५ दिवसांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला. यानंतर मुंजाने पिडीतेला पंढरपूर येथे पळवून नेले. 

याबाबतची तक्रार पिडीतेच्या आईने गुरुवारी रात्री सोनपेठ पोलिस ठाण्यात दिली. यावरून गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सपोनी अमोल पवार हे करत आहेत. 

Web Title: Minor girl raped in Sonpeth from two years