शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

नागपुरात  अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 11:17 PM

लग्नाचे आमिष दाखवून एका मित्राने हिंगण्यात नेऊन बलात्कार केल्याची तक्रार १६ वर्षीय मुलीने नोंदवली. विशेष म्हणजे, ज्याने दोनदा बलात्कार केला, त्याचे पूर्ण नावसुद्धा आपल्याला माहीत नसल्याचे मुलीने यशोधरानगर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लग्नाचे आमिष दाखवून एका मित्राने हिंगण्यात नेऊन बलात्कार केल्याची तक्रार १६ वर्षीय मुलीने नोंदवली. विशेष म्हणजे, ज्याने दोनदा बलात्कार केला, त्याचे पूर्ण नावसुद्धा आपल्याला माहीत नसल्याचे मुलीने यशोधरानगर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. योगेश नामक हा तरुण २२ वर्षांचा असून, तो निलडोह हिंगणा भागात राहतो, असे तरुणीने म्हटले आहे.मुलगी यशोधरानगरात राहते. तिच्या घराच्या बाजुला गेल्या वर्षी टाईल्स फिटींगच्या कामासाठी तो आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत मुलीची मैत्री झाली. त्याने आपले नाव योगेश असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने १ मार्च २०१८ ला त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. तेथे त्याने शरीरसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला असता तिने विरोध केला. त्यावेळी आरोपीने बलात्कार केला. त्यानंतर ४ नोव्हेंबरला पुन्हा त्याने तरुणीला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, मुलगी दिवसभर गायब असल्यामुळे आईवडिलांना संशय आला. त्यामुळे त्यांनी तिला विचारणा केली असता योगेशने त्याच्या घरी नेऊन बलात्कार केल्याचे आणि कुणाला माहिती दिल्यास मारेन, अशी धमकी दिल्याचे सांगितले. आईवडिलांनी तिला सरळ पोलीस ठाण्यात नेले. यशोधरानगर पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून योगेशविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारnagpurनागपूर