शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून व्हिडिओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी; आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 14:06 IST

अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना तो नेहमी तिचा पाठलाग करायचा. एकेदिवशी तिला बाहेर फिरायला घेऊन जाऊन बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले...

पिंपरी : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिच्या आई-वडील, बहिणीला जीवे मारण्याची आणि बलात्काराचा व्हिडिओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा शरीरसंबंध ठेण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या नराधमाला चिखली पोलिसांनी गजाआड केले.  कुलदिप सुभाष धुमाळ (वय २८, रा. घरकुल, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  पीडित मुलगी आणि आरोपी हे ओळखीचे आहेत. कुलदिपने पीडित मुलीला फूस  लावून मैत्रीच्या जाळ्यात ओढले. अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना तो नेहमी तिचा पाठलाग करायचा. एकेदिवशी तिला बाहेर फिरायला घेऊन जाऊन बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्याचे अश्लील व्हिडिओ व फोटो काढले. संबंधित घटना पीडित मुलीने आई - वडिलांना सांगितली. तेव्हा पीडित मुलीच्या आई-वडील आणि बहिणीला कुलदिपने जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित अल्पवयीन मुलीसोबत व्हिडिओ आणि फोटो तिच्या मोबाईलवर पाठवून पुन्हा शारीरिक संबंधाची मागणी केली. मुलगी घाबरली होती. तिने त्यास नकार दिला असता हेच फोटो पीडित मुलीच्या मावस भावाला पाठवले. अखेर मुलीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRapeबलात्कारArrestअटक