Crime News : चंद्रपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली आहे. असं सांगण्यात आलं की, पीडित मुलगी नवव्या वर्गात शिकते. ही घटना समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉस्के अॅक्टनुसार, गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आणि पुढील चौकशी सुरू आहे.
ही घटना पोंभुर्णा तहसीलच्या एका गावातील आहे. इथे नवव्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीच्या पोटात अचानक वेदना सुरू झाल्या. जेव्हा तिची आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली तेव्हा टेस्टनंतर डॉक्टरांनी सांगितलं की, मुलगी गर्भवती आहे. हे ऐकून तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर तिने पोलिसांना सूचना दिली.
पीडित मुलीने पोलिसांना सांगितलं की, गावात राहणाऱ्या एका तरूणाने तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले होते. ज्यामुळे तिच्यावर ही वेळ आली. पीडितेच्या जबाबानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत गावातील 19 वर्षीय तरूण लोकेश चुदरी याला अटक केली. आरोपीने सांगितलं की, त्याचं पीडितेसोबत प्रेम प्रकरण सुरू आहे.
पोलीस म्हणाले की, मोबाइल आणि इंटरनेटची सध्या खूप गरज आहे. पण अनेक तरूण चुकीचं पाउल उचलतात. अशात मुलांना योग्य माहिती देणं गरजेचं आहे. पीडितेची आई म्हणाली की, तिच्यासमोर एक गंभीर समस्या उभी राहिली आहे आणि तिला कळत नाहीये की, आता काय करावं.