पिंपरी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुनी सांगवी येथे रविवारी घडली. जॉन्टी जोसेफ पाटोळे (वय २२, रा. पेटकर बिल्डिंग, ढोरेनगर, गल्ली क्र. २, जुनी सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपीने पीडित मुलीच्या घरी जावून घराच्या खिडकीच्या काचा फोडण्यासह दरवाजा तोडला. यामध्ये मुलीच्या कपाळास दरवाजाचा मार लागला. त्यानंतर घरात शिरलेल्या आरोपीने घरातील पाण्याचा माठ फोडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. दरम्यान, पीडित मुलीची मदतीसाठी आजी व भाऊ गेले असता आरोपी आजीला मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेला. तसेच मुलीचे आई-वडील व भाऊ यांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून घरातून पसार झाला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 19:24 IST
पीडित मुलीची मदतीसाठी आजी व भाऊ गेले असता आरोपी आजीला मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेला...
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी
ठळक मुद्देसांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल