शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हापूस आंब्याचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 20:18 IST

माणिकपूर पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपाला अटक

वसई: एका अल्पवयीन मुलीला हापूस आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार वसई पूर्व स्थित समर्थ रामदास नगरात घडला असल्याचे रविवारी उघडकीस आले आहे.या संदर्भात माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी नराधमाच्या मुसक्या आवळून त्याच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 354 अन्वये व बालकांचे लैगिक शोषण अत्याचार कायदा 2012 चे कलम 8,10 आणि 12 प्रमाणे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करीत त्यास अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतला दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी नवघर पूर्व येथील रहिवासी असून घरातील लागणाऱ्या वस्तूसाठी तीचे अधून मधून दुकानात येणे जाणे असल्याने 55 वर्षाच्या आरोपीची नजर या पीडित मुलीवर आधीच पडली होती. मागील आठ दिवस झाले तो या मुलीला हापूस आंबे देण्याच्या बहाण्याने हेरायच्या तयारीत होता, अखेर शनिवारी या नराधमाने या पीडित मुलीला हापूस आंबा देतो असे आमिष सांगून स्वतःच्या दुकानात नेऊन तिथे तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन करून तिच्यावर अतिप्रसंग केला.दरम्यान घडल्या प्रकाराची करुण कहाणी पीडित मुलीने आपल्या आईला सांगितली असता व्यथित झालेल्या पीडित मुलीच्या आई-वडिलांनी थेट माणिकपूर पोलीस ठाणे गाठून त्या नराधमाने केलेल्या कृत्याचा पाढाच पोलिसांसमोर वाचून त्याआरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी या आरोपीवर गुन्हा नोंद करुन त्यास अटक केली असता त्या आरोपीला कोर्टात हजर केलं असता मात्र कोर्टाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतला दिली.

या संदर्भात माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत लॉकडाऊन काळातदेखील लहान मुलींवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पालकवर्गाकडून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे