फेसबुकवर बनावट अकाऊंट काढून अल्पवयीन मुलीची बदनामी करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 18:48 IST2018-07-31T18:44:51+5:302018-07-31T18:48:42+5:30
फेसबुक या सोशल साईटवर अल्पवयीन मुलीचे फोटो टाकून तिची बदनामी करणाऱ्या एकाला ग्रामीण पोलिसांच्या सायबर शाखेने अटक केली.

फेसबुकवर बनावट अकाऊंट काढून अल्पवयीन मुलीची बदनामी करणारा अटकेत
औरंगाबाद : फेसबुक या सोशल साईटवर अल्पवयीन मुलीचे फोटो टाकून तिची बदनामी करणाऱ्या एकाला ग्रामीण पोलिसांच्या सायबर शाखेने अटक केली. यश मनोज शिंदे (रा. भवानीनगर, जुना मोंढा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, फेसबुकवर आपल्या अल्पवयीन मुलीचे फोटो टाकून त्याखाली अश्लील मजकूर टाकण्यात आल्याचे पीडितेच्या वडिलांना कळले. याप्रकरणी त्यांनी अज्ञात आरोपीविरोधात चिकलठाणा ठाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीची माहिती सायबर क्राईम सेलला मिळताच पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम.एम. सय्यद, कर्मचारी कैलास कामठे, रवींद्र लोखंडे, योगेश तरमळे, योगेश दारवंटे, जीवन घोलप, गजानन बनसोड यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला.
पोलीस तपासात फेसबुकवर बनावट अकाऊंट उघडून हा उपद्व्याप करण्यात आल्याची माहिती हाती आली. अधिक तपास केला असता ते फेसबुक अकाऊंट यशने उघडले असल्याचे निष्पन्न झाले.