शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅसिडने जाळून अल्पवयीन मुलीची केली हत्या; बलात्कार करून तिला मारल्याचा कुटुंबीयांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 21:32 IST

Murder case :मुलीच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीवर आधी बलात्कार केला आणि नंतर निर्घृण हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देही घटना मुजफ्फरपूरच्या मनियारी पोलिस स्टेशन परिसरातील आहे. जिथे माधोपूर सुस्टा येथे राहणारी 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी 31 मे रोजी अचानक बेपत्ता झाली.

बिहारच्या मुझफ्फरपूर येथून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे काही उपद्रवी लोकांनी प्रथम अल्पवयीन मुलीचे अपहरण केले आणि त्यानंतर अ‍ॅसिडने जाळून तिला ठार केले. मुलीच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीवर आधी बलात्कार केला आणि नंतर निर्घृण हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.ही घटना मुजफ्फरपूरच्या मनियारी पोलिस स्टेशन परिसरातील आहे. जिथे माधोपूर सुस्टा येथे राहणारी 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी 31 मे रोजी अचानक बेपत्ता झाली. घरातील सदस्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यादिवशी जेव्हा ती आपल्या आईसह बाजारात जात होती, तेव्हा दोन स्कूटीवरील काही मुलांनी मुलीला पळवून नेले होते. घरातील सदस्यांनी मुलीचा शोध सुरू ठेवला पण तिचा काहीही पत्ता लागला नाही.मुलीच्या त्रस्त कुटुंबीयांनी  २ जून रोजी मनियारी पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांना ही घटना सांगितल्यानंतर सोनू कुमार आणि त्याच्या तीन भावांविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तेव्हापासून पोलिस त्या अल्पवयीन मुलीचा शोध घेत होते. दरम्यान, कुधनी पोलिस ठाण्याच्या अक्राहा पुलाखालून एका मुलीचा जळालेला मृतदेह सापडला.गुरुवारी पोलिसांनी मुलीचा मृतदेहाची ओळख पटवली. ती मणियारीच्या माधोपूर सुस्टा येथे राहणारी शंकर रायची एकुलती 17 वर्षांची मुलगी होती. त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत होती. त्या छायाचित्रांमधून त्याची ओळख पटली. मुलीला अ‍ॅसिडने जाळून टाकले. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मुलीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तिच्या घरात शोककळा पसरली आहे. कुटूंबाच्या तक्रारीच्या आधारे दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आता तिन्ही आरोपींची चौकशी केली जात आहे.

 

 

 

 

टॅग्स :Deathमृत्यूKidnappingअपहरणBiharबिहारPoliceपोलिस