व्हिडिओ कॉलचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By विलास जळकोटकर | Updated: January 5, 2024 17:46 IST2024-01-05T17:46:26+5:302024-01-05T17:46:48+5:30
या प्रकरणी पिडितेने पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला, प्रथमेश माने असे आरोपीचे नाव आहे.

व्हिडिओ कॉलचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार
सोलापूर : कॉलेजला चाललेल्या अल्पवयीन मुलीला तुझे व्हिडिओ कॉल केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन दुचाकीवर जबरदस्तीने बसवले. लॉजवर नेऊन तिच्याशी जबरदस्तीने अत्याचार करण्याची धक्कादायक घटना सोलापुरातील एका परिसरात गुरुवारी घडली. या प्रकरणी पिडितेने पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला, प्रथमेश माने असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादीत पिडितेने म्हटले आहे की, यातील आरोपी हा गेल्या दोन महिन्यापासून पिडिता कॉलेजला जात असताना तिचा पाठलाग करीत होता. यावर पिडितेने त्याला जाब विचारला असता ‘तू ओळखीची आहेस म्हणून मागे येतो’ असं उत्तर दिले होते. ऑक्टोबर २३ मध्ये आरोपीने पिडितेच्या आत्याचा मोबाईल क्रमांक मिळवून पिडितेला फोन, व्हिडिओ कॉल करायचा. पिडितेने त्याला यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करुनही त्याने ऐकले नाही.
४ जानेवारी २३ रोजी सकाळी ७:३० ला पिडिता कॉलेजला जात असताना तिला अडवून गाडीवर बसण्यास सांगितले. पिडितेने विरोध करताना तिला व्हिडिओ कॉल केलेले फोटो व्हायरल करेन अशी धमकी देऊन जबरदस्तीने गाडीवर बसवले. बार्शी रोडवरील एका हॉटेल कम लॉजवर नेऊन फोटो डिलिट करण्यासाठी शरीरसुखाची मागणी केली. जबरस्तीने अत्याचार केला. तेथून आरोपीने पिडितेला त्याच्या नातलगाकडे सोडून गेला. घरी आल्यानंतर पिडितेने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यावरुन पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवण्यात आली. तपास महिला फौजदार जेऊघाले करीत आहेत. या प्रकरणी आरोपीस अद्याप अटक केलेली नाही.