शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्काराचा आरोप असलेल्या विधिसंघर्ष बालकाने गळफास लावून केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 21:17 IST

Suicide Case : सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात आरोपीने दुमका येथील हिजला रोड येथील बाल सुधारगृहात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे.

ठळक मुद्दे दुमका येथे आल्यानंतर त्याला कोरोनामुळे अलग ठेवण्यात आले. त्याने चादरीने गळफास लावून घेतला. 

झारखंडच्या पाकुरमध्ये 16 एप्रिल रोजी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या एका 15 वर्षीय विधी संघर्ष बालकाने  बाल सुधार गृहात गळफास लावून आत्महत्या केली. सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात आरोपीने दुमका येथील हिजला रोड येथील बाल सुधारगृहात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. दुमका येथे आल्यानंतर त्याला कोरोनामुळे अलग ठेवण्यात आले. त्याने चादरीने गळफास लावून घेतला. पोस्टमॉर्टमनंतर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांच्या पथकाने मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केला. बाल सुधार गृह प्रभारी बाबर यांच्या फिर्यादीनंतर मुफस्सिल पोलिस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस आत्महत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आठवड्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीसह सामूहिक बलात्काराच्या घटनेत 15 वर्षाच्या विधी संघर्ष बालकास पकुर येथील दुमका बाल सुधार गृहात पाठविण्यात आले होते. पीडित मुलीबरोबर सामूहिक बलात्काराचे अनेक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.या विधी संघर्ष बालकास १७ एप्रिलच्या दिवशी दुमका येथे पाठवल्यानंतर इतर बाल कैद्यांपेक्षा वेगळ्या खोलीत एकट्याने अलग ठेवण्यात आले. रात्री दोन गार्डची ड्युटी होती. संध्याकाळी खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता. गुरुवारी सकाळी गार्डने खोलीचा दरवाजा उघडला असता विधी संघर्ष बालक चादरीला लटकलेला अवस्थेत  होता. गळफास लावून घेण्यापूर्वी तो बादलीवर उभा राहिला आणि गळ्यात फास टाकल्यानंतर बादली पायाने बाजूला केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळ