शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मार्चमध्येच केले होते मंत्र्यांच्या विकेटचे भाकीत; परमबीर सिंह यांच्या निकटवर्तीयाचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 05:25 IST

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या १०० कोटी रुपयांच्या वसुली टार्गेट दिल्याच्या आरोपांवरून राज्यातील मंत्र्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे.

मनीषा म्हात्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या १०० कोटी रुपयांच्या वसुली टार्गेट दिल्याच्या आरोपांवरून राज्यातील मंत्र्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे; मात्र नुकत्याच मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या खंडणीच्या गुह्यांत परमबीर सिंह यांच्या निकटवर्तीय व्यावसायिक संजय पुनामिया याने मार्चमध्येच राज्यातील मंत्र्यांच्या विकेटचे भाकीत केल्याची धक्कादायक माहिती तक्रारदाराच्या जबाबातून समोर आली आहे, तसेच राज्यातील सरकार पडून परमबीर सिंह पुन्हा मुंबई पोलीस आयुक्त पदावर येणार असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात व्यावसायिक श्याम अग्रवाल यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्यासह पोलीस उपायुक्त अकबर पठाण आणि एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात संजय पुनामिया आणि सुनील जैनला अटक करण्यात आली आहे.

यात तक्रारदाराने दिलेल्या जबाबात, सिंह तसेच त्यांच्या सहकाऱ्याने मागितलेल्या खंडणीचा लेखाजोखा मांडला. दुसरीकडे, २३ मार्च ते ३० मार्च दरम्यान पुनामियासोबत झालेल्या बैठकांदरम्यान त्याच्या मोबाइलवर परमबीर सिंह आणि पोलीस उपायुक्त अकबर पठाण व इतर अधिकारी यांचे वेळोवेळी फोन येत होते. तेव्हा संजय पुनामियाने दावा केला होता की, सिंह यांच्या १०० कोटी जमा करण्यासंबंधित पत्राबाबत सीबीआय, एनआयए चौकशी सुरू होणार, चार ते पाच मंत्र्यांची विकेट पडणार, सरकार अडचणीत येणार. तसेच वाझे संपर्कात असल्याचे सांगितले होते. पुनामियावर महाराष्ट्र सरकारमधील मोठ्या नेत्यांची विकेट घेण्याची जबाबदारी घेतल्याचेही नमूद केले. लवकरच महाराष्ट्र सरकार पडेल आणि सिंह पुन्हा आयुक्त पदावर येणार किंवा केंद्र सरकार सिंह यांना मोठे पद देणार असल्याचे भाकीत केले होते.’

घाबरलेल्या तक्रारदारांनी फिर्याद टाळली

पुनामियाने सांगितलेले घडत गेल्यामुळे तक्रारदार घाबरले आणि तक्रारीसाठी पुढे आले नसल्याचे जबाबात नमूद केले आहे, तसेच या बैठकांदरम्यान वॉइज रेकॉर्डिंग असलेले दोन पेन ड्राइव्ह पोलिसांना देण्यात आले आहेत. यात तीन आणि दोन तासांच्या रेकॉर्डिंगचा समावेश आहे. त्यानुसार,  पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगMumbaiमुंबईPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग