शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मन सुन्न करणारी घटना! खेळत असलेल्या चिमुकलीला नराधमाने घरी नेऊन केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 21:14 IST

Rape on Kid in Roha : नराधम राकेश शिर्के (36) याने लहानगीला स्वतःच्या घरी नेवून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. चाळीचे मालक चंद्रकांत पार्टे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.

रोहा - रोहा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना रविवारी घडली. अवघ्या 5 वर्षाच्या बालिकेवर 36 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने एकच संताप व्यक्त झाला. रविवारी सायंकाळी आरोपी राकेश शिर्के याने अल्पवयीन मुलीला घरी नेवून लैंगिक अत्याचार केले, आरोपीला पोलिसांनी रात्री उशीरा अटक केल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली. मुलीला अधिक उपचारार्थ अलिबाग येथे हलविण्यात आले आहे.रोहा तालुक्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अलिकडे वाढ झाली आहे. अत्याचाराचे सत्र सुरु असतानाच रविवारी सायंकाळी रोहा शहरातील पार्टे चाळीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली. सायंकाळी 6 च्या सुमारास लहानगी अंगणात खेळत होती. खेळता-खेळता ती अचानक बेपत्ता झाल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्या मुलीचा आजी-आजोबांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी नराधम राकेश शिर्के वय 36 याने लहानगीला स्वतःच्या घरी नेवून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. चाळीचे मालक चंद्रकांत पार्टे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.

आरोपीने सबंधीत मुलीवर अत्याचार केला. ही माहिती पोलिसांना समजताच आरोपीने पळ काढला.  फिर्यादीच्या म्हणण्यावरुन सदर आरोपी राकेश शिर्के याच्या विरुद्ध 376, 378(2)(i)(i), 376 (3), 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तदनंतर आरोपीला रोहा पोलिसांनी तातडीने अटक केली. अधिक तपास पेण उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही.व्ही. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक तृप्ती बोराडे करीत आहेत. दरम्यान, रोहा तालुक्यात यापुर्वी तांबडी सामुहिक बलात्कार, पेण येथील अल्पवयीन मुलीवर अष्टमी परिसरात लैंगिक अत्याचार प्रकरणे घडली आहेत. त्यांचा तपास अद्याप सुरु आहे. या घटना ताज्या असतानाच रविवारी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्याने माणुसकी व कायदा सुरक्षेचा गंभीर प्रश्न रोहा तालुक्यात निर्माण झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसArrestअटकsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण