शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

पेन्सिल पॅकिंग जॉबच्या नादात गमावले लाखो; मेकॅनिकची वांद्रे पोलिसांत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 10:06 IST

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तरुणाची धडपड

मुंबई : घरबसल्या पेन्सिल पॅकिंग करून हजारो रुपये कमवा अशी जाहिरात बऱ्याचदा फेसबुकवर आपण पाहिली असेल. नामांकित कंपन्यांच्या पेन्सिल बॉक्समध्ये भरून त्यामार्फत नफा देण्याच्या आमिषाला वांद्रेतील एक ऑटो मेकॅनिक फसला आणि त्याच्या खात्यातून लाखभर रुपये काढून घेण्यात आले.

तक्रारदार सोहेल बेग (२५) हा शिवडीमध्ये खाजगी कंपनीत मेकॅनिक म्हणून काम करतो. मात्र, गेले सहा महिने त्याला नोकरी नसल्याने सध्या लग्नाच्या डेकोरेशनची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. बेगने १ मे रोजी मोबाइल पाहत असताना त्याला पेन्सिल पॅकिंगचे काम घरबसल्या करून महिन्याला ३० हजार रुपये आणि त्यातही १५ हजार ॲडव्हान्स मिळतील, अशी जाहिरात पाहिली. त्याचवेळी त्याला व्हाॅट्सॲप क्रमांकावरून फोन आला व कामाची माहिती देणारा रेकॉर्डेड ऑडिओही पाठविला. यूपीआय आयडी आणि स्कॅनर पाठवत त्यावर ६०० व २० रुपये भरण्यास सांगितले जे गुगल पे मार्फत बेगने भरले व त्याला एक आयडेंटिटी कार्ड पाठवले गेले. 

आयकार्ड आणि डिलिव्हरी बॉयनटराज पेन्सिल कंपनी, बेगचे नाव, जन्मतारीख, लिंग, जॉयनिंग डेट आणि रोल अशी माहिती भरलेले आयडेंटिटी कार्ड पाठविले. त्यानंतर एका व्यक्तीने फोन केला जो डिलिव्हरी बॉय असून १५ दिवसांचे पेन्सिल मटेरियल आणि एकूण भरलेले १६ हजार २२० रुपये आणल्याचे त्याने सांगितले. मात्र, त्याआधी आयकार्डचे ३ हजार १५० रुपये भरण्यास सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर बेगच्या घरापासून तो अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असल्याचेही कथित डिलिव्हरी बॉयने सांगितल्याने बेगने ते पैसे भरले. पुढे डिलिव्हरीला उशीर झाल्याने अजून ३ हजार १०० रुपये मागत हे सर्व पैसे तुम्हाला आम्ही परत पाठवणार असे सांगितले. एकंदरच या ना त्या कारणाने बेगकडून त्यांनी ९४ हजार ४१९ रुपये वेगवेगळ्या यूपीआय आयडीमार्फत घेत त्याची फसवणूक केली आणि त्याने वांद्रे पोलिसात धाव घेतली.