पेणमध्ये घरफोड्या करून लाखोंचे दागिने चोरट्यांनी विकले उत्तर प्रदेशात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 17:28 IST2018-11-28T17:28:08+5:302018-11-28T17:28:52+5:30
रिझवान अन्सारी व मोहम्मद रईस हे दोघे रायगडमध्ये येवून पेणनजीक परिसरात राहत आणि चोऱ्या, घरफोडया करून उत्तरप्रदेश येथे परत जात असत.

पेणमध्ये घरफोड्या करून लाखोंचे दागिने चोरट्यांनी विकले उत्तर प्रदेशात
अलिबाग - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे मोहम्मद रिझवान अब्दुल मन्नान अन्सारी (सध्या राहण्याचे ठिकाण - पनवेल रेल्वे स्टेशनजवळ आणि मूळ राहण्याचे ठिकाण - बेरखा-बिजनौर,उत्तरप्रदेश) यास शिताफिने ताब्यात घेवून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार मोहम्मद रईस (राहणार - बेरखा-धामपुर,उत्तरप्रदेश) यांच्यासोबत अलिबाग, पोयनाड, वडखळ, दादर सागरी आणि माणगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. तसेच मोहम्मद रिझवान अन्सारी याने दादर सागरी पोलीस ठाण्याच्या गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे दागिने बिजनौर(उत्तरप्रदेश) येथील व्यापा-याला विकले होते. त्या सोनाराला देखील अटक करून त्यांच्या कडून 17 ग्रॅम सोन्याचे दागीने तर इतर सोनाराकडून 152 ग्रॅम सोन्याचे दाग-दागिने असे एकूण 322 ग्रॅम सोन्याचे 9 लाख 75 हजार रुपये किंमतीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. रिझवान अन्सारी व मोहम्मद रईस हे दोघे रायगडमध्ये येवून पेणनजीक परिसरात राहत आणि चोऱ्या, घरफोडया करून उत्तरप्रदेश येथे परत जात असत.