'दुरोंतो'मधून चांदीसह लाखोंची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:27 IST2020-02-29T00:25:23+5:302020-02-29T00:27:30+5:30
दुरोंतो एक्स्प्रेसमधून चांदीसह लाखोंची रोकड मुंबईला नेणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

'दुरोंतो'मधून चांदीसह लाखोंची रोकड जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुरोंतो एक्स्प्रेसमधून चांदीसह लाखोंची रोकड मुंबईला नेणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी बाळासाहेब सुखदेव घोटाळे याला अटक केली आहे.
सिनियर डीएससी भवानी शंकर नाथ यांनी आरपीएफचे पीआय आर. आर. जेम्स व एपीआय एच. एल. मीना यांच्या नेतृत्वात प्लॅटफॉर्म क्र. ८ वर पथक तैनात केले होते. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एकाच्या संशयित हालचाली दिसून आल्या. दुरोंतो (१२२९०) प्लॅटफॉर्मवर येताच एस ४ च्या बर्थ २८ वर बाळासाहेब घाटोळे हा बॅग घेऊन बसला. संशय आल्याने लोहमार्ग पोलिसांनी त्याची चौकशी केली. बॅगची तपासणी केली असता चांदी आणि लाखोंची रोकड त्यात आढळली. घाटोळे हा मुंबईतील एका कुरियर कंपनीचे नागपुरातून काम पाहतो. त्या कुरियर कंपनीच्या संचालकांचे नाव पांडुरंग पाटील असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत घाटोळेला ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलीस चौकशी करीत होते.